आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

आम आदमी पार्टीकडून शहरात साचलेल्या पाण्यामध्ये कागदी होड्या सोडून प्रशासनाचा निषेध…

दोन दिवसांत शहरातील खड्डे बुजवण्यात आले नाही, तर खड्यांमध्ये झाडे लावू. रविराज काळे, आम आदमी पार्टी युवक शहराध्यक्ष.

Spread the love

आम आदमी पार्टीकडून शहरात साचलेल्या पाण्यामध्ये कागदी होड्या सोडून प्रशासनाचा निषेध…Aam Aadmi Party condemns the administration for leaving paper boats in the stagnant water in the city…

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, २३ जुलै.

पिपरी चिंचवड शहरात शेकडो कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीचे स्वप्न पिंपरी चिंचवडकरांना दाखवण्यात आले. परंतु, सध्या शहराची खासकरून पिंपळे निलख, विशालनगर, रक्षक चौक, कस्पटे वस्ती या परिसरात जागोजागी पाणी साचलेले दिसते.

स्मार्ट सिटीच्या कामाच्या नावाखाली अनेक ठिकाणी रस्ते खोदाई करून ठेवण्यात आले आहे. त्याच जागी अनेक मोठमोठे खड्डे पडलेले दिसतात. आपच्या वतीने ‘ड’ प्रभागातील जनसंवाद सभेत याबाबत मागणी केली. परंतु प्रशासक असल्याने या अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही. त्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचण्यास कारणीभूत असणाऱ्या ठेकेदारांना नेमके शहरातील रस्त्यांवर पाणी साचवण्याचे काम दिले होते की, रस्ते स्मार्ट करण्याचे काम दिले होते, याची चौकशी मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी करावी.

या घटनेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीने शहरात साचलेल्या पाण्यामध्ये होड्या सोडून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. येत्या दोन दिवसांत शहरातील खड्डे बुचवण्यात आले नाही, तर खड्यांमध्ये झाडे लावू अन्यथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावाने या खड्ड्यांचे नामकरण करू, असा इशारा आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!