मावळ

कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी अवस्थेत असलेल्या सांबराला जीवदान;

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान देण्यात आले.

Spread the love

कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी अवस्थेत असलेल्या सांबराला जीवदान; वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान देण्यात आले.Lifesaving Sambara injured in dog attack; He was given life support by Maval Sansthan, a wildlife protector.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २३ जुलै.

मावळातील कार्ला जेवरेवाडी परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सांबरास वन्यजीव रक्षक संस्थेकडून जीवदान देण्यात आले.कार्ला परिसरातील जेवरेवाडी वेहेरगाव परिसरात एका सांबरावर कुत्र्यांनी हल्ला केला त्यात ते सांबर जखमी झाले. त्यास वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांच्या सदस्यांकडून प्राथमिक उपचार करून पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

वन्यजीव रक्षक संस्था मावळ संस्थापक निलेश संपतराव गराडे रेस्क्यू टिमचे अध्यक्ष.गणेश निसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सदस्य प्रमोद ओव्हाळ,संकेत भानुसघरे,जिगर सोलंकी, यश बच्चे, व वन विभागाच्या शिरसाट मॅडम आदि या रेस्क्यू मध्ये सहभागी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!