आपला जिल्हाकृषीवार्तासामाजिक

भारतीय मजदूर संघाचा स्थापना दिवस तसेच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान संपन्न.

६८ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड च्या जवळील टेकडीवर वृक्षारोपण अभियानाअंतर्गत विविध प्रकारची १५० झाडे लावून पर्यावरण पुरक असा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

Spread the love

भारतीय मजदूर संघाचा स्थापना दिवस तसेच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान संपन्न.Foundation day of Bharatiya Mazdoor Sangh as well as tree plantation and tree conservation campaign completed.

आवाज न्यूज : देहूरोड प्रतिनिधी, २३ जुलै.

आज दि.२३/०७/२०२३ रोजी भारतीय मजदूर संघाच्या ६८ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड च्या जवळील टेकडीवर वृक्षारोपण अभियानाअंतर्गत विविध प्रकारची १५० झाडे लावून पर्यावरण पुरक असा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

या उपक्रमात सहा संस्था सहभागी झाल्या होत्या.

१) ऑर्डनन्स फॅक्टरी देहुरोड – सर्व संघटना व असोसिएशन.

२)विजयशेठ जगताप योगा मित्र मंडळ, पिंगळे गुरव.

३) JSPM संस्थेचे शाहू कॉलेजचे स्टाफ व विद्यार्थी

४) देहुरोड डॉक्टर असोसिएशन

५) श्री रघुनाथ ढोले, देवराई फाऊंडेशन, पुणे

६) वृक्षदायी प्रतिष्ठान, श्री क्षेत्र देहू.

यावेळी भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हा चे अध्यक्ष. अर्जुन चव्हाण यांनी भारतीय मजदूर संघाच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. निसर्ग मित्र विभागाचे कार्याध्यक्ष. भास्कर रिकामे व डॉ. रमेश बन्सल यांनी सहभागी संस्थांच्या कार्याची माहिती दिली. पिंपरी चिंचवड सरसंघचालक. विनोद बन्सल यांनी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धना बाबत मार्गदर्शन केले. अशोक थोरात यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

या उपक्रमासाठी देवराई फाउंडेशन च्या ढोले सरांच्या वतीने १५० देशी झाडांची रोपे मोफत उपलब्ध करून देण्यात आली.स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे १५-२० निसर्ग मित्र यांचा वृक्षारोपण करण्यात मोलाचा वाटा होता.वृक्षारोपण करण्यासाठी खड्डे घेण्यासाठी फॅक्टरीमधील कंत्राटी कामगारांचे मोलाचे सहकार्य लाभले.भारतीय संरक्षण कामगार संघ, तसेच ठेकेदार कामगार संध,ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड मधील इतर संघटना व असोसिएशनचे प्रतिनिधी, सर्व सहभागी संस्था यांच्या सहभागातून व सहकार्यातून वृक्षारोपण उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. सर्व सहभागी पर्यावरण प्रेमींचे, भारतीय संरक्षण कामगार संघाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!