आरोग्य व शिक्षण

मुलगी सासरी जाताना बाप लग्नात एका कोपऱ्यात उभा असतो ;रडू आवरून तो मुलीला निरोप देतो – ह.भ.प.रामदास महाराज

Spread the love

लोणावळा : मुलगी सासरी जाताना बाप लग्नात एका कोपऱ्यात उभा असतो ;रडू आवरून तो मुलीला निरोप देतो. दोनशे फुटापर्यत मुलगी दूर जाईपर्यंत तो तिथे पहात , तिला निरोप देतो.आईच्या गळ्यात पडून रडणारी मुलगी , बापाला कोपऱ्यात उभा पाहून ढसढसा रडते ,ती सारे वैभव सोडून नवीन घरी जात असते, असे ह.भ.प.रामदास महाराज पाटील यावेळी कीर्तनात म्हणाले .

पाटण , मळवली येथील अविनाश नारायण तिकोणे व चि.सौ.कां.प्रियांका मातेरे यांच्या शुभ विवाहानिमित्त आयोजित सत्यनारायण पूजेप्रसंगी कीर्तनकार रामदास महाराज पाटील बोलत होते. यावेळी मृदूंगाचार्य ह.भ.प.काशिनाथ महाराज गाडे व ह.भ.प.संतोषबुवा घनवट , श्रीहरी घनवट , संदिप महाराज घारे ,यांनी साथसंगत केली.. गायनाचार्य माऊ महाराज तिकोणे , कीर्तनकार दिलीप महाराज खेंगरे , भिमाजी भानुसघरे , अनंता शिंदे , प्रविणमहाराज केदारी , तुषारमहाराज दळवी यांनी गायनाची साथ दिली . ह.भ.प.पाटील महाराज यावेळी म्हणाले.

ञेतायुगात शाबर प्रदेशात मातंग ऋषी रहात होते त्या भागात एक आठ दहा वर्षाची शबरी लग्नाच्या आधी घर सोडून आलेली राहू लागली . ती आश्रमाचा परिसर स्वच्छ ठेवीत असताना श्रीराम तुझी भेट घेतील , असे ऋषींच्या बोलण्यावरून विश्वास ठेवून बाहत्तर वर्षापर्यत राहिली. अखेर श्रीराम , लक्ष्मण येथे आले. तिची तपश्चर्या फळास आली. तिने फुलांच्या पायघड्या व रांगोळी काढून त्यांचे स्वागताला बोरे खायला दिली. अत्यंत आई वडिलांच्या लाडक्या मुलाला परदेशात जायला लागले , तर तेथील जेवणाच्या ताटाकडे पाहून आईने वाढलेल्या भाजी भाकरी ची चटकन आठवण झाल्याशिवाय रहात नाही.मुलगी सासरी माप ओलांडून घरात प्रवेश करते , तेव्हा तिच्या मनात विलक्षण कालवाकालव होते ,असे संत तुकाराम महाराज यांच्या ” ” क्षणभरी आम्ही सोशिले वाईट । । साधिले अवीट नीजसुख ! ! २!! या अभंगाचेवर बोलताना मुलीचे सासरी जाणे आई बापासाठी , नाजूक व भावनात्मक प्रसंग असल्याचे महाराजांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!