आरोग्य व शिक्षण

वारकरी संप्रदायातील अंजनाबाई भसे व ह.भ.प.शिवराम भसे यांच्या सहस्ञचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त कीर्तन

Spread the love

लोणावळा : पंढरपूर चे पायी वारकरी अंजनाबाई शिवराम भसे व ह.भ.प.शिवराम नामदेव भसे यांचे सहस्ञचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त ता.३ रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम व १२ .१५ वाजता सहस्ञचंद्रदर्शन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले असून यावेळी स्वामी निरजानंद सरस्वती (परमहंस) आणि भक्तिनिष्ठ शंकर महाराज मराठे तसेच राजस्थान वारकरी सांप्रदाय मंंडळाचे प्रदेशाध्यक्ष रमेशचंद्रजी व्यास यांचे शुभाशिर्वाद व छञपती शिवाजी महाराज यांचे वंशज छञपती संभाजीराजे भोसले , खासदार यांचे प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे विशाल लाॕन्स , एम. आय. डी.सी. रोड , तळेगाव आयोजन केले आहे.

यावेळी मावळरत्न पुरस्काराचे वितरण होणार आसून साडेबारा ते तीन स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ संस्थापक नंदकुमार शिवराम भसे , त्यांचे बंधू नामदेवराव शिवराम भसे , निवृत्ती शिवराम भसे आणि तानाजी शिवराम भसे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पञकात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!