महाराष्ट्र

नवमी भजनी मंडळांच्यावतीने सप्ताहाची काल्याचे कीर्तनाने सांगता.

Spread the love

नवमी भजनी मंडळांच्यावतीने सप्ताहाची काल्याचे कीर्तनाने सांगता.. लोणावळा ता.१(प्रतिनिधी ) भांगरवाडी येथील नवमी भजनी मंडळांच्यावतीने आखंड हरिनाम सप्ताहाची ह.भ.प.काळुराम महाराज देशमुख यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता झाली. श्री गणपती व लक्ष्मी नारायण मंदिर , भांगरवाडी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंडळाचेवतीने अध्यक्ष अॕंड .माधवराव भोंडे यांचे हस्ते कीर्तनकार व नवमी भजनी मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मृदूंगमणी संदिप घारे , कु.वेदांत घारे यांनी साथसंगत केली. यावेळी संत तुकाराम महाराज सेवा समिती अध्यक्ष भरतशेठ येवले , नवमी भजनी मंडळ माजी अध्यक्ष धोंडिबा विकारी यांचा सत्कार करण्यात आला..सप्ताहामधे ता.२२ पासून ह.भ.प.घनश्याम पडवळ , ह.भ.पृ.सुभाषमहाराज पडवळ , ह.भ.प.भगवान पडवळ,ह.भ.प.नितीन विकारी यांची प्रवचन सेवा झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!