आरोग्य व शिक्षण

आनंद माडगूळकर यांचेकडून गदिमा आणि बाबुजी तथा सुधीर फडके यांच्या आठवणींना उजाळा.

वसंत व्याख्यानमाला समिती आयोजित माझ्या खिडकीतून गदिमा.

Spread the love

आनंद माडगूळकर यांचेकडून गदिमा आणि बाबुजी तथा सुधीर फडके यांच्या आठवणींना उजाळा.

गीत रामायण आणि चिञपटातील गिते यांच्या अनेक आठवणी सांगत गायक आनंद  माडगूळकर गदिमा आणि बाबुजी यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. निमित्त होते वसंत व्याख्यानमाला समिती आयोजित माझ्या खिडकीतून गदिमा हा आठवणींना⋅ उजाळा देणारे भाषण झाले. यावेळी आकाशवाणी येथील प्रसिध्द निवेदक आनंद देशमुख , अॕड. बापूसाहेब भोंडे विद्यालयाचे श्री विद्या निकेतन ट्रस्टचे अध्यक्ष अॕड.माधवराव भोंडे , प्रसिद्ध कायदेतज्ञ सुहास नागेश , आणि वसंत व्याख्यानमाला समिती ट्रस्टचे अध्यक्ष गीताताई माधवराव भोंडे आणि अध्यक्ष संजय गायकवाड आदी उपस्थित होते. तुळशीचे रोप , शाल , पुष्पगुच्छ देवून  .आनंद माडगूळकर व आनंद देशमुख यांचा समितीतर्फे  नागेश भोंडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

व देशमुख यांचा परिचय संजय वाघ यांनी करून दिला.
मै तुलसी तेरे आंगन की , वाट पाहते पुनवेची, या चिञपटातील पटकथा , संवाद लिहण्याचा योग आला. ज्ञानियांची ज्ञानेश्वरी व महाराष्ट्रातील संगीत परंपरा सह शेकडो अनुबोधपट तयार करताना तसेच गदिमा व सुधीर फडके यांची संयुक्त रचना असलेल्या गीतरामायणाचे महाराष्ट्रात सातशे प्रयोग झाले. गदिमा यांना मा.विनायक यांचेकडे प्र के अञे घेवून गे ले .तिथे त्यांना रामजोशी चिञपटातील पहिले काम मिळाले. त्यातील सवाल जबाब मुळे तो १०० आठवडे चालला. त्यात ललिता पवार नायिका , तर बाबुराव पेँढारकर खलनायक होते..त्यानंतर ब्रँडीची बाटली हा चिञपट , त्यात चार गाणी लिहली. माझ्या व्हटात डाळींब फुटलं. सांगा राघु मी नाही कधी म्हटलं । । अशी लावणी लिहलेली गाजली. त्यानंतर वंदेमातरम हा चिञपट काढला..त्यानंतर सर्व टीम सहा महिने बेकार होती. त्यानंतर राजा गोसावी व नलीनी नागपूरकर यांचा पेडगावचे शहाणे हा वेड्या माणसावर लिहलेला चिञपट गाजला. १९५२ -५३ मधे १५ पैकी १२ चिञपट पटकथा , गिते गदिमा यांची होती. माझाही वाट पहाते मी पुनवेची हा चिञपट निघाला. गदिमा यांनी गादी निर्माण केली. नंतर नरवीर तानाजी चिञपट आला. वामनराव कुलकर्णी श्रीधर स्वामींचे भक्त होते.तेथे गडावर गदिमा यांचे जिभेवर श्रीधर स्वामींनी ओंकार रेखाटला ..! ! त्यानंतर पुण्यात डेक्कन ला माणिक वर्मांनी गायलं. ते सिताकांत लाड यांचे हातात गीत दिल्यामुळे पहिले गाणे बाबुजी यांचेकडे गेल्यावर हरवले. मग पंचायत झाली.लाड यांनी गदिमा यांना खोलीत कोंडले , व गीत लिहायला सांगितले . गदिमा यांनी पंधरा वीस मिनिटांत गीत लिहून दिले. बावन्न गीते झाल्यावर आणखी चार गिते लिहून झाली..त्यातील तिसरे गीत लतादीदींनी गायले. तुझे रूप चित्ती लाभो , हे गीत ऐन लग्नाच्या धामधुमीत सभोवती मिञपरिवार व नातेवाईकांच्या गराड्यात घेतले. गीतरामायण मी १९८१ पासून ३० वर्षे शेकडो प्रयोग केले. सुमारे तीस वर्षे ! गदिमा व सुधीर फडके यांच्यात अनेकदा खटके उडाले..मग जगदिश खेबुडकरांकडून बाबुजी गिते घेत.. हनुमान प्रभुराम रायाला विनंती करतो ञिवार जयजयकार , तसेच प्रभु मज एकचि वर द्यावा..
१९८०-८२ च्या काळात देवकीनंदन गोपाळा या चिञपटातील माझ्या भूमिकेत विठ्ठलाचे पायी थरारली वीट ! ! हे गीत चिञीकरण झाले . यावेळी सूञसंचालन प्रविण देशपांडे व प्रशांत पुराणीक यांनी केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक ,मावळ वार्ता फौडेशन संस्थापक संजय आडसुळे , जितेंद्र कल्याणजी , तसेच अॕड.माधवराव भोंडे , .

राधिका भोंडे , आणि मान्यवर उपस्थित होते..प्रारंभी स्वागतगीत पञकार संतोषी तोंडे यांनी गायले. शिक्षिका नंदा तांदळे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!