महाराष्ट्र

नानेकरवाडीत अल्पवयीन तरुणीचा खून संशयित ताब्यात…    

Spread the love

नानेकरवाडीत अल्पवयीन तरुणीचा खून संशयित ताब्यात…    

आवाज न्यूज चाकण प्रतिनिधी : सध्या चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. सलग दोन दिवस एका व्यक्तीचा आणि एका अल्पवयीन तरुणीचा खून झाल्याची धक्कादायक बातमी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

दिनांक २५ जून रोजी कडाचीवाडी परिसरात एका व्यक्तीचा निर्घृण पणे खून करण्यात आला होता. त्या घटनेला कुठे चोवीस तास उलटतात तोच नानेकरवाडी गावात २६ जून २०२२ रोजी दुपारी प्रीती कुमारी संतोष शाह ( वय १७, सध्या रा. नानेकरवाडी, चाकण, मूळ रा. फतेपुर, बिहार) नामक मुलीचा खून करण्यात आला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रीती कुमारी ही रविवारी घरात एकटी असताना एक तरुण घरात शिरला. त्यानंतर त्याने तरुणी एकटी असल्याचा फायदा घेऊन घराचे दार लावून घेतले. त्यानंतर त्याने तरुणीचा गळा आवळून तिचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित तरुणीवर खुणा पूर्वी अत्याचार झाला होता का? या बाबत अधिकृत माहिती शवविच्छेदन व उत्तरीय तपासणी नंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!