अध्यात्मिकमावळसामाजिक

दुर्गा माता मंदिर नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

१५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता देवीचा महाअभिषेक मायदेव काका यांच्या हस्ते होणार असून, तद्नंतर घटस्थापना  महिला भगिनींच्या हस्ते  करण्यात येणार. किशोर परदेशी.

Spread the love

दुर्गा माता मंदिर नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.Durga Mata Temple organizes various programs on the occasion of Navratri festival.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १४ ऑक्टोबर.

दुर्गा माता मंदिर नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन, करण्यात आले आहे यावर्षी मंदिराचे सहावे वर्षे असून मंदिरामध्ये भजन कीर्तन पठण कन्या पूजन देवीचे सहस्त्रनामावली याचे नऊ दिवसात नियोजन केले आहे.

उद्या दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता देवीचा अभिषेक मायदेव काका यांच्या हस्ते होणार असून, तद्नंतर घटस्थापना  महिला भगिनींच्या हस्ते  करण्यात येणार आहे.

रोज सायंकाळी साडेसात वाजता  संबळच्या तालावर हरीष ढेंबे देवीचे गोंधळी यांच्या संबळच्या तालावर विविध मान्यवरांच्या हस्ते  महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रीनिमित्त मंदिराची आकर्षक  अशी सजावट करण्यात आली. मंदिराची सजावट प्रेमनाथ परदेशी, सुजित परदेशी, राजु परदेशी, समर्थ परदेशी यांनी केली आहे.  मंडप ची व्यवस्था फेमस लाईट डेकोरेटर्स अनिल भालेराव यांच्याकडून करण्यात आली.

दिनांक १५/१०/२०२३ ते दिनांक २४/१०/२०२३” शारदीय नवरात्र महोत्सवातील शके १९४५ धार्मिक कार्यक्रम”.

आश्विन शु. १ रविवार दि. १५/१०/२०२३,नवराञारंभ सकाळी श्री दुर्गा माता देविची सकाळी १० वाजता देविची प्रतिष्ठापना व व अभिषेक श्री मायदेव गुरुजी ( शुक्लाकाका ) व तद्नंतर घटस्थापना. सायंकाळी ७.३० वा. महाआरती.

*आश्विन शु. २ सोमवार दि. १६/१०/२०२३* ८ वा. भजनसंध्या. श्री दिगंबर काका कुलकर्णी.

*आश्विन शु. ३ मंगळवार दि. १७/१०/२०२३, भजनसंध्या ८ वा सुभाष वाळुंज आणी पार्टी.

आश्विन शु.४ बुधवार दि. १८/१०/२०२३*, ८ वा. श्री. रेणुका भजनी मंडळ विठ्ठल मंदिर तळेगाव दाभाडे.

*आश्विन शु. ५ गुरुवार दि. १९/१०/२०२३* ललिता पंचमी श्री दुर्गा देवींची नित्योपचार पुजा. समस्त तळेगाव नगरीच्या कल्याणासाठी
*नवचंडी याग* सकाळी ७.०० ते दुपारी १२.०० वा. पर्यंत. विश्व हिंदू परिषद्, बजरंग दल तळेगाव दाभाडे
कंन्यापुजन सायंकाळी ६ वा. भजनसंध्या. सप्तश्रृंगी भजनी मंडळ पुणे. उषा वाणी, ज्योत्स्ना परदेशी.

*आश्विन शु. ६ शुक्रवार दि.२०/१०/२०२३*सुहासिनी भोजन,श्रीसुप्त पठण ( मायदेव काकु ) , **कंन्यापुजन

**सायंकाळी ८ वा.अधिमाता शुभंकरोती श्रवंत पठण अनिरुद्ध उपासना केंद्र तळेगाव दाभाडे.

*आश्विन शु.७ शनिवार दि. २१/१०/२०२३*८ वा. अमर खडकेश्र्वर एकतारी भजन.

*आश्विन शु.८ रविवार दि. २२/१०/२०२३,सायंकाळी ८ वा. भजनसंध्या, संगीत साधना. गरूड बंधू

*आश्विन शु. ९ सोमवार दि. २३/१०/२०२३*
सोमवार, सकाळी ६ वा.बजरंग दल
तळेगाव दाभाडे प्रेरीत
श्री दुर्गामाता दौडीचा प्रारंभ,

**सायंकाळी ८ वा. श्री दत्त प्रासादिक बाल भजनी मंडळ मोहितेवाडी मावळ.

*रोजची महाआरती आवाज न्यूज चॅनलला लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.* Live Telecast

अशी माहिती दुर्गा माता मंदिर चे संचालक किशोरभाऊ परदेशी यांनी आवाज न्यूज न्यूजला दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!