आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन.

Spread the love

प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन.Organizing various activities on the occasion of International Year of Cereals in Pratibha Education College.

आवाज न्यूज : गुलाम अली भालदार, चिंचवड प्रतिनिधी, २१ जुलै.

 

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बी.एड. व डी.एस.एम. शाखेत शिक्षण घेत असलेल्या भावी विद्यार्थी, शिक्षकांना व सेवेतील शिक्षकांना शिकविण्याच्या पद्धती व कला बरोबरच सामाजिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी त्याच्या सुप्तकला व कौशल्याचा विकास करून आदर्श शिक्षक कसे होतील या उदात्त हेतूने संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या प्रेरणा व प्रोत्साहन व प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त भोसरी येथील उर्जा प्रतिष्ठानचे प्रकाशालय येथे अनाथ, गरजू, अंध मुलांसाठी समन्वयिका डॉ. सुवर्णा गायकवाड, विभाग प्रमुख प्रा. अस्मिता यादव, डॉ. संतोष उमाटे समवेत बी.एड. चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तज्ञाकरवी योग प्रात्याक्षिके, नृत्य सादरीकरण, आरोग्य संदर्भात मार्गदर्शन, मतदानाविषयी जागरूकता, वर्ग सजावट, स्वच्छता मोहीम राबवीत रोख रकमेचा धनादेश जीवनावश्यक वस्तू उर्जा प्रतिष्ठानचे प्रकाशलयाचे प्रमुख पंकज कुलकर्णी यांना सामाजिक बांधिलकी व जाणीवेमधून प्रदान करण्यात आली.

महाविद्यालयात पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमात व्याख्याते डॉ. सतीश चव्हाण यांचे व्याख्यान झाले. त्यात त्यांनी आरोग्यविषयक आहाराचे पौष्टिकदृष्ट्या मूल्य प्रतिपादित करून दैनंदिन आहारामध्ये आहाराचे संतुलन कसे राखावे, पौष्टिक अन्नधान्य पदार्थाचा रोजच्या आहारात समावेश करण्यामागील विविध कारणे विषद करून विविध आजारापासून आपण दूर कसे राहू शकतो, नियमित व्यायामाची गरज का आहे. याबाबत विविध उदाहरणाद्वारे पटवून देत जनजागृती केली.

यावेळी पाककला स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्याचा डॉ. चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पल्लवी चव्हाण, समन्वयिका डॉ. सुवर्णा गायकवाड समवेत प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यार्थ्यांनी अनुश्री वत्स यांनी केली. पाहुण्यांची ओळख दीक्षा पाटील तर; सूत्रसंचालन आभा जोशी व आभार मृणाल डंबे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!