आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

अतिवृष्टीमुळे लोणावळा व वाकसई ,देवकर मधील शेती पाण्यात..

काही ठिकाणी ओढ्यावर व नाल्यावर बांधकामे झाल्यामुळे नैसर्गिक प्रवाह अडवले गेले असून त्याचा फटका पिकांना बसण्याची शक्यता आहे..

Spread the love

अतिवृष्टीमुळे लोणावळा व वाकसई ,देवकर मधील शेती पाण्यात..

आवाज न्यूज:लोणावळा ता.१०(प्रतिनिधी ) अतिवृष्टीमुळे लोणावळा व वाकसई , देवकर मधील शेती पाण्यात गेली आहे.
परिसरात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून शेतात साचलेले पावसाचे पाणी तुडूंब भरल्यामुळे पाण्यात भातरोपे बुडून गेली आहे.

या भागात काही ठिकाणी ओढ्यावर व नाल्यावर बांधकामे झाल्यामुळे नैसर्गिक प्रवाह अडवले गेले असून त्याचा फटका पिकांना बसण्याची शक्यता आहे..
कार्ला , मळवली , पाटण भागातही अशीच परिस्थिती आसून या भागातील काही नाल्यावरील अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली असून प्रवह मोकळे करण्यात आले आहे.या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेकडून लक्ष घालण्यात आल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने कारवाई केली , तशी कारवाई देवघर , वाकसई , वाकसईचाळ , या परिसरात करावी , अशी मागणी दुग्धव्यवसायिक , प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब येवले यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!