मावळराजकीय

मावळात एकवीस ग्रामपंचायतीचे निवडणुकीत भाजप दहा जागी विजयी ; भाजेमधे श्री जाखमाता परिवर्तन पॕनेलला विजय.

Spread the love

मावळात एकवीस ग्रामपंचायतीचे निवडणुकीत भाजप दहा जागी विजयी ; भाजेमधे श्री जाखमाता परिवर्तन पॕनेलला विजय.

आवाज न्यूज  : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, ७ नोव्हेंबर.

मावळात एकवीस ग्रामपंचायतीचे निवडणुकीत भाजप दहा जागी विजयी ; भाजेमधे श्री जाखमाता परिवर्तन पॕनेलला विजय मिळाला.सुमारे दहा वर्षांनी सत्ता परिवर्तन भाजे गावात झाले.यामुळे आनंद भंडारा उधळून साजरा करताना माञ , गावात एकोपा राहावा , यासाठी मिरवणूक काढणे टाळण्यात आले, असे माजी सरपंच नंदकुमार पदमुले , तसेच आमित ओव्हाळ व नवनिर्वाचित सरपंच पदी निवडून आलेल्या प्रिया आमित ओव्हाळ , तसे ज्येष्ठ ग्रामस्थांतर्फे सांगण्यात आले.

भाजेमधे विजयी झालेले नवनिर्वाचित सदस्य प्रमोद ढगे, विकास वाल्हेकर, सारीका पदमुले, प्रमोद , ज्योती कोकाटे, उज्वला काळे, प्रताप गरवड, कविता चौरे, कोमल केदारी आणि सरपंच पदासाठी प्रिया आमित ओव्हाळ हे उमेदवार विजयी झाले.यावेळी बोलताना ग्रामस्थांसमोर ओव्हाळ यांनी गावातील ज्यांनी ज्यांनी आम्हाला साथ दिली, त्या जनतेचा हा विजय आहे. गावातील प्रलंबित कामे पूर्ण करून विकास करणार. अनाथ आश्रम संपर्क बालग्राम साठी पुरेशा पाण्याची व्यवस्था तसेच पर्यटनदृष्ट्या गावाचा विकास करणार असे सांगितले.

लोहगड येथे सरपंचपदी सोनाली प्रमोद बैकर बिनविरोध निवडून आल्या.तसेच सदस्य म्हणून पंढरीनाथ विखार, ज्योती धानिवले, स्वाती मरगळे, स्नेहल ढाकोळ, महेश शेळके, काजल ढाकोळ, अभिषेक बैकर हे विजयी झाले.

मुंढावरे येथे सरपंचपदी राणी सनी जाधव निवडून आल्या.सदस्यपदी सचिन गरूड, स्वप्नजा थोरात, शोभा वाघमारे, संदिप जाधव, कविता बांगर, सारीका बांगर , रामदास थोरवे , आमोल थोरवे , सोनाली थोरवे विजयी झाले.कुसगाव बुद्रूक येथील वार्ड क्रमांक ३मध्ये एका पोटनिवडणुकीमधे रविंद्र कालेकर विजयी झाले.वडगाव मावळ येथे काल सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला.

विजयी झालेले सरपंच पदाचे उमेदवार.

साळुंब्रे -विशाल शामराव राक्षे ,आढले बुद्रूक : सुवर्णा बाळासाहेब घोटकुले , ओवळे :दिलीप ज्ञानेश्वर शिंदे , डोणे : ऋषिकेश कोंडिबा कारके , आंबळे :आशा संपत कदम , उदेवाडी : नेहा आक्षय उंबरे , शिळींब : सिध्दार्थ चंद्रकांत कडू , जांबवडे : तानाजी बंडू नाटक , पुसाणे : आमोल ज्ञानेश्वर वाजे , शिरगाव :पल्लवी प्रविण गोपाळे , दिवड : गणेश खंडू राजिवडे,सांगिसे : सुनिता योगेश शिंदे , सुदूंबरे : मंगल कालिदास गाडे, कल्हाट, शिवाजी तानाजी करवंदे, कोँडिवडे :राधा विश्वनाथ मुढारकर , मळवंडी ढोरे : गोरख काशिनाथ ढोरे , बेबडओहळ : तेजल राकेश घारे, सुदवडी :सुमित शिवाजी कराळे असे निवडून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!