आरोग्य व शिक्षण

तळेगाव दाभाडे नगरपरिषद व्हॉट्सॲप द्वारे करणार नागरीकांच्या तक्रारींचे निवारण..

व्हाट्सएप तक्रार निवारण प्रणाली  या क्रमांकावर  ९८९०६१६०८९   सुरु...

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषद व्हॉट्सॲप द्वारे करणार नागरीकांच्या तक्रारींचे निवारण..

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे प्रतिनिथी

तळेगाव दाभाडे : नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरीकांसाठी व्हाट्सएप तक्रार निवारण प्रणाली  या क्रमांकावर       ९८९०६१६०८९   सुरु करण्यात आली असून
या प्रणालीमार्फत तळेगाव दाभाडे शहरातील नागरीकांना शहरातील आरोग्य, रस्ता, पाणीपुरवठा व नगरपरिषदेशी संबंधित इतर सेवांविषयक तक्रारी दाखल करता येणार आहेत. मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने या व्हाट्सएप तक्रार निवारण प्रणाली निर्मिती करण्यात आलेली आहे.

सदर तक्रार नोंदविणे, तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेणे इ. बाबी आता नागरिक शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन पद्धतीने मोबाईल/ संगणकाद्वारे घरबसल्या करू

यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वेळेची बचत होइल. नागरिकांनी केलेल्या तक्रारींना ३ दिवसात नगरपरिषद प्रशासनाकडून प्रतिसाद दिला जाईल. तसेच तक्रार निवारणासंदर्भातील माहितीसुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच सदर व्हाट्सएप तक्रार निवारण प्रणालीवर कळविण्यात येईल असे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले. या तक्रार निवारण प्रणालीचा नागरिकांनी वापर केल्यास प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, गतिमान तसेच पारदर्शी होण्यासाठी निश्चित मदत होईल, अशी आशा मुख्याधिकारी यांनी व्यक्त केली. त्यामुळे नागरिकानीं या व्हाट्सएप तक्रार निवारण प्रणालीचा जास्तीतजास्त उपयोग करावा असे आवाहन मुख्याधिकारी यांनी तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!