आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

कार्लाच्या श्री एकविरा देवीच्या गडावर भाविकांकडून गर्दीचा सागर उसळला..

भाजेतील धबधबा या ठिकाणी १४४ कलम लावल्यामुळे पर्यटकांनी व भाविकभक्तांनी श्रीएकविरा गडावर व पायथा मंदिराकडे मोर्चा वळविला...

Spread the love
कार्लाच्या श्री एकविरा देवीच्या गडावर भाविकांकडून गर्दीचा सागर उसळला..
आवाज न्यूज:लोणावळा ता.१७(प्रतिनिधी ) कार्लाच्या श्री एकविरा देवीच्या गडावर भाविकांकडून गर्दीचा सागर उसळला होता.
जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार भुशीडॕमचे बरोबरच लायन्स पाँईंट , टायगर पाँईंट ही पर्यटनस्थळे , व लोहगड , विसापूर , गडकिल्ले , भाजेलेणी , भाजेतील धबधबा या ठिकाणी १४४ कलम लावल्यामुळे पर्यटकांनी व भाविकभक्तांनी श्रीएकविरा गडावर व पायथा मंदिराकडे मोर्चा वळविला होता. या ठिकाणी प्रचंड गर्दीचा महासागर आज पहायला मिळाला.
पोलिसांकडून पुरेसे वहातूक कोंडी सोडविण्यासाठी मनुष्यबळ न लावल्यामुळे भाविकांकडून वादावादी होताना दिसत होते.
सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कार्लाफाटा ते येवले निवास व समृद्धी हाॕटेलपर्यतच फक्त दुपदरी रस्ता करण्यात आल्याने आणि ओम हाॕटेल समोरच्या बाजूला वरच्या बाजूला पुरेशा गटाराचे बांधकाम न केल्याने सुमारे फुटभर पाणी रस्त्यावरून वाहताना दिसले .त्यामुळे वाहनचालकांना ञास सहन करावा लागत होता..
सुमारे सत्तर ऐशी हजार पर्यटक , भाविकांकडून आज दर्शनास गडावर गर्दी केल्याचे दिसले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!