मावळसामाजिक

वाकसईचाळ येथे विचित्र अपघातात ग्रामपंचायतीचे सरपंच पदाच्या उमेदवारासह दोघे गंभीर जखमी ; कारचे मोठे नुकसान.

Spread the love

वाकसईचाळ येथे विचित्र अपघातात ग्रामपंचायतीचे सरपंच पदाच्या उमेदवारासह दोघे गंभीर जखमी ; कारचे मोठे नुकसान.Sarpanch candidate of Gram Panchayat, two seriously injured in freak accident at Vakasaichal; Major damage to the car.

आवाज न्यूज : मंच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २ डिसेंबर.

वाकसईचाळ येथे मारूती एरटिका कारला महिंद्रा कंपनीची कार धडकून महामार्गावर गेल्याने ट्रक आणि कार त्यावर आदळून भीषण विचित्र अपघातात वाकसई, देवघर ग्रूपग्रामपंचायतचे निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवारासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत.लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मोटार अपघात रजिस्टर नंबर 17/2023 प्रमाणे अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

जखमी व खबर देणार महेश जयवंत येवले (वय-२९वर्षे , व्यवसाय- किराणा दुकान, राहणार वाकसईचाळ ता. मावळ जि.पुणे),व सौ.सविता जयवंत येवले (वय -४०,रा-वाकसईचाळ, ता.मावळ, जि-पुणे )अपघातीतल वाहने 1) मारुती एअरटिका मॉडेलची कार नं , एमएच १४ जेएच , ४४५५,महींद्रा कंपनीची पांढरे रंगाची कार नं. एमएच १४ जे एक्स ४५०८ ,अशोक लेलंड कंपनीचा ट्रक नं.एमएच १२एचडी ९३४९, महिंद्रा कंपनी ची कार क्रमांक एचएच २३बीसी ८१२३ ,अशी वाहने यात आढळून आली.

अपघात घडले ता.वे.ठिकाणी ता.१ डिसेंबर २०२३ रोजी सव्वातीन वाजता सुमारास वाकसईचाळ ता. मावळ जि.पुणे गावचे जुना पुणे मुंबई हायवे रोडवर अपघात घडला.हकीकत वर नमुद केले ता. वेळी व ठिकाणी यातील ख़बर देणार यांनी खबर दिली की, ता.१ रोजी दुपारी दीडचे चे सुमारास मी व माझी आई सविता असे आम्ही दोघे महाराष्ट्र बैंक कार्ला येथे काम असल्याने माझी मारुती ईरटिका मॉडेलची कार एमएच१४जेएच ४४५५ हिने हिने कार्ला येथे गेलो होतो. तेव्हा कार मी चालवत होतो. बँकेतील काम संपवुन मी दुपारी दोन वा.५० वा.चे सुमारास पुन्हा मी व माझी आई सविता माझी मारुती एअरटिका मॉडेलची कारनं एमएच१४जेएच ४४५५ मधुन कार्ला येथुन वाकसई चाळ येथे येण्यास जुने मुंबई पुणे महामार्गाच्या लेनने निघालो. कार मी चालवित होतो. ड्राईवर सिट च्या बाजुच्या सिटवर आई सविता बसली होती. आम्ही सिटबेल्ट लावले होते. ३ .१५ वा . चे सुमारास वाकसईचाळ हायवे कट येथुन वाकसईचाळ बाजुस वळण्याकरीता मी उजव्या बाजुचा इन्डीकेटर लावुन कारचा स्पिड कमी करुन माझी कार वाकसईचाळ हायवे कट मध्ये मुंबईकडुन येणारी वाहणे जाईपर्यंत थांबवली. अचानक माझे कारला उजव्या बाजुने पाठीमागुन जोरात धडकल्याचा आवाज आला व माझी कार त्या धक्क्याने मुंबई पुणे लेनवर जाऊन समोरुन मुंबई बाजुने येणारे अशोक लेलंन्ड कंपनीचा ट्रक ला जाऊन धडकली व अपघात झाला.

अपघातामध्ये माझे उजव्या हाताचे पोटरीवर जखम झाली. नाकास मार लागला व उजव्या पायाच्या गुडघ्यावर मुका मार लागला. आई सविता हिचे चेह-यास व नाकास गंभीर दुखापत झाली. माझे कारला पाठीमागुन धडक देणारी महींद्रा कंपनीची पांढरे रंगाची कार नं. एमएच १४जे एक्स ४५०८ ही असुन सदर कार मधिल चार ईसम हे अपघात करुन आम्हास कोणत्याही प्रकारची मदत न करता कार तेथेच सोडुन पळुन गेले आहेत.

अपघातामधील अशोक लेलंन्ड कंपनीचा ट्रक नं. नं.एमएच १२एचडी ९३४९, असुन अपघात झाल्यानंतर अपघात करणारे महीद्रा कार एचएच १४जे.एक्स ४५०८ हीस महिंद्रा कंपनी ची कार क्रमांक एचएच २३बीसी ८१२३ ही पाठीमागून धडकली आहे.अपघातामध्ये माझी आई सविता हिचे मनिमंगळ सुत्र पडुन गहाळ झाले आहे. सदरचा अपघात महींद्रा कंपनीची पांढरे रंगाची कार नं. एएच १४ जेएक्स ४५०८ ही वरील चालकाच्या चुकीमुळे झाला आहे. तरी पुढील तजबिज व्हावी, असे चालकाने फिर्यादीत म्हटले आहे.
या आपघातातील तपास करणारे आधिकारी पो.नाईक पवार यांनी सदर आपघातातील वाहने बाजूला करून जखमींना स्थानिक नागरिकांचे मदतीने कार्ला येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींची प्रकृती सुधारत आहे.

पुढील तपास लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पवार करीत आहे. पंचनामा करून अपघाताची खबर पोलिस सहाय्यक फौजदार दरेकर यांनी र.नं.१७/२०२३ प्रमाणे नोंद केली आहे. जखमी झालेल्या सविता येवले या वाकसई, देवघर ग्रूपग्रामपंचायतचे पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच पदाच्या महिला गटातील उमेदवार असून त्यांनी आदल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!