महाराष्ट्रसामाजिक

संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन सोहळ्यानिमित्त मावळ व कोकणातील पायी वारकरी दिंड्यांना अल्पोपहार व सन्मान.

Spread the love

संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन सोहळ्यानिमित्त मावळ व कोकणातील पायी वारकरी दिंड्यांना अल्पोपहार व सन्मान.On the occasion of Saint Dnyaneshwar Mauli Sanjeevan celebration, refreshments and honor to the foot soldiers of Maval and Konkan.

आवाज न्यूज : मंच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २ नोव्हेंबर.

संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन सोहळ्यानिमित्त मावळ व कोकणातील पायी वारकरी दिंड्यांना अल्पोपहार व सन्मान मावळ तालु वारकरी सांप्रदाय मंडळांच्यावतीने ता.५,६ व ७ रोजी करण्यात येणार आहे.

जांभूळफाटा येथे संतकृपा व्यापारी संकुलाचे मधे हा कार्यक्रम सकाळी सात वाजता वारकऱ्यांचे उपस्थितीत सुरू होईल.ता.६ रोजी ९.३०वा. कॕलेंडरचे प्रकाशन स्वामी निरंजानंद सरस्वती, परमहंस, वैराग्यमुर्ती शंकर महाराज मराठे व उद्योजक. रमेशचंद्रजी व्यास, भंडारा डोँगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांचे शुभहस्ते व मावळचे माजीमंञी संजय तथा बाळा भेगडे, आमदार सुनिलआण्णा शेळके, किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार, उद्योजक रामदास काकडे, बाळासाहेब नेवाळे, भास्करराव म्हाळसकर यांचे उपस्थितीत होईल.

निमंञक मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार शिवराम भसे, सचिव रामदास पडवळ, कायदेशीर सल्लागार अॕड.सागर शेटे, उपाध्यक्ष दिलीपशेठ वावरे यांनी प्रसिध्द केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!