कृषीवार्तामहाराष्ट्र

यंदा बाप्पा पावला! गणपती बप्पा मोरया ।।

गणपती मूर्तीच्या उंचीवर मर्यादा नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ।।।

Spread the love

यंदा बाप्पा पावला! गणपती बप्पा मोरया ।।

गणपती मूर्तीच्या उंचीवर मर्यादा नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ।।।

आवाज न्यूज २१ जुलै ,मुंबईची जी नियमावली आहे. तीच राज्यभर लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूर्त्यांच्या ऊंचीवर मर्यादा होती. ती काढून टाकली आहे.

मुंबई : गणेशोत्सव आणि इतर सण सुरळीत पार पाडण्यासाठी आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. मंडप आणि इतर परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजे यासाठी खेटे घालायला लागू नये यासाठी एक खिडकी योजना आणि ऑनलाईन परवानग्या दिल्या आहेत. या मंडळांना कोणत्याही प्रकारचं नोंदणी शुल्क भरावे लागणार नाहीत याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यांना शुल्कातून सूट दिली आहे. खड्डे खोदण्यासाठी पैसे घेता मंडपाचे चार्जेस यातून सवलत दिली आहे. तसेच मंडळांकडून हमीपत्र घेत होते. ते घेण्यास मनाई केली आहे. वर्षानुवर्ष गणेशोत्सव करणाऱ्यांकडून हमीपत्र घेऊ नका असं सांगितलं.

नियमांचं पालनं करावं लागेल. पण त्याचा बागुलबुवा उभा करू नये याच्या सूचना केली आहे. मुंबईची जी नियमावली आहे. तीच राज्यभर लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूर्त्यांच्या ऊंचीवर मर्यादा होती. ती काढून टाकली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!