आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीतील सक्षम ओबीसी, अनुसुचित जाती व जमाती मधील इच्छुक उमेदवारांना संधी देण्यास सेल च्या पदाधिकारी यांनी दिले कोअर कमिटी ला निवेदन..

नुकत्याच होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका ओबीसी आरक्षित जागेवर अनेक ओबीसी तरुण उमेदवार इच्छुक आहेत, ते पक्षात सक्रिय आहेत.

Spread the love
राजकीय:आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीतील सक्षम ओबीसी, अनुसुचित जाती व जमाती मधील इच्छुक उमेदवारांना संधी देण्यास सेल च्या पदाधिकारी यांनी दिले कोअर कमिटी ला निवेदन..

आवाज न्यूजः प्रतिनिधी रेशमा फडतरे २ ऑगष्ट   

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के आरक्षण वैध ठरवले.
महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेल्या बांठिया आयोगामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले. यावेळी सर्व ओबीसी बांधवानी या निर्णयाचे स्वागत केले.
नुकत्याच होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका ओबीसी आरक्षित जागेवर अनेक ओबीसी तरुण उमेदवार इच्छुक आहेत, ते पक्षात सक्रिय आहेत.

मावळ तालुक्यात ओबीसी सेल, सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभाग यांचे संघटनेच्या बांधणीमध्ये मोठा वाटा आहे. पक्षात सक्रिय काम करत असलेल्या इच्छुक उमेदवारांना ओबीसी, अनुसुचित जाती व जमाती आरक्षित जागेवर उमेदवारी मिळावी अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल, सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभाग च्या पदाधिकारी यांनी कोअर कमिटी सदस्य आमदार सुनिल आण्णा शेळके, गणेश खांडगे, बापुसाहेब भेगडे, बबनराव भेगडे, विठ्ठलराव शिंदे, सुभाषराव जाधव, बाबुराव वायकर, दिपक हुलावळे यांना निवेदनाद्वारे केली.

यावेळी पुणे जिल्हा ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, मावळ तालुका ओबीसी सेल अध्यक्ष मंगेश खैरे, महिला अध्यक्षा सौ. संध्या थोरात, ज्येष्ठ नगरसेवक आयुब शिकीलकर, खादी ग्रामोद्योग चेअरमन अंकुश आंबेकर, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, मावळ सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विकी लोखंडे, ओबीसी वरिष्ठ उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, तळेगाव सचिव गोकुळ किरवे, वडगाव ओबीसी सेल अध्यक्ष मयुर गुरव, इंदोरी ओबीसी सेल अध्यक्ष स्वप्निल शेवकर, सामजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा ज्योती आंबेकर, मावळ तालुका ओबीसी सेल उपाध्यक्षा सविता मंचरे, वैशाली लगाडे, अर्चना भोकरे, नीलिमा शिंदे, सुधा भालेकर, लक्ष्मी गजाकोश, गणेश पाटोळे, सोनू भालेराव, राहिल तांबोळी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!