आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

महर्षी कर्वे आश्रमशाळेत २०० फूट तिरंगा ध्वज..

मावळमधील कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने २०० फुट तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Spread the love

 

महर्षी कर्वे आश्रमशाळेत २०० फूट तिरंगा ध्वज

कामशेत : मावळमधील कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने २०० फुट तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

आवाजन्यूजः शिवानंद कांबळे,  कामशेत प्रतिनिधी. दि.१४

रोजी महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत येथील ४३० आदिवासी विद्यार्थी यांनी आश्रमशाळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक,बाजारपेठ,महाराष्ट्र बँक,गावठाण,मच्छी मार्केट,पोलीस स्टेशन शेजारून आश्रमशाळा येथे २०० फूट तिरंगा राष्ट्रध्वज रॅलीचे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

या रॅलीत देशभक्ती वर आधारित गीत गायन व घोषणा देण्यात आल्या. मोठया संख्येने विद्यार्थी, शिक्षक व कामशेत गावठाणातील ग्रामस्थ उपस्थित होते. सदर रॅलीचे नियोजन आश्रम शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी नियोजन केले.

आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता देवरे प्रभारी मुख्याध्यापक तुकाराम पवार, पंढरीनाथ वाडेकर, श्रीकांत बुरांडे देविदास नेरे, गोकुळ खैरनार, पाठक मॅडम, संजय हांडे, राजेंद्र जगताप,अधीक्षक अर्जुन ढेरंगे,दत्ता जाधव,दत्तात्रय माने, मयूर देशपांडे, अजित डुंबरे,पद्मिनी कांबळे,सारिका पाटील सर्व कर्मचारी वृंद सदर रॅलीत सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून येत होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!