आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

भारत स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मशाल मोर्चाचे आयोजन वडगांव मावळ येथील खंडोबा मंदिर येथे करण्यात आले होते..

Spread the love

आवाज न्यूजः शिवानंद  कांबळे मावळ प्रतिनिधी १४ ऑगष्ट

भारत स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मशाल मोर्चाचे आयोजनआज सायं 6 वा. वडगांव मावळ येथील खंडोबा मंदिर येथे करण्यात आले होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वडगाव मावळ येथे ‘मशाल रॅली’ काढण्यात आली.

“प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्य संग्रामाच्या स्मृती तेवत रहाव्यात, भारतमातेसाठी ज्या ज्ञात/ अज्ञात क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. त्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची भावना जनमनात सदैव रहावी व भारतभूमीती कृतज्ञेची जाणीव दृढ व्हावी हा उद्देश ठेवत ‘मशाल रॅली’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व प्रसन्न वातावरणात संपन्न झाला. ”

यावेळी आमदार सुनील  शेळके,रा.काॅ.ता.अध्यक्ष गणेशजी खांडगे,जि.प.सभापती बाबूराव  वायकर,वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, ता.सरचिटणीस ॲड कृष्णाभाऊ दाभोळे,ता.युवक अध्यक्ष किशोर सातकर,देहूरोड शहर अध्यक्ष प्रवीण झेंडे,देहूरोड महिला अध्यक्षा अरुणाताई पिंजण, देहूरोड शहर युवती अध्यक्ष कु.संस्कृती सुधीर ढगे,मावळ रा.काॅ.

उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव,पिंपरी-चिंचवड EPS 95 पेन्शन धारक संघटनेचे अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत,माजी अध्यक्ष मिकी कोचेर,देहूरोड श.रा.काॅ. उपाध्यक्ष नंदकुमार काळोखे, देहूरोड श.रा.काॅ.उपाध्यक्षबाळासाहेबआवंढे,तानाजी काळभोर, गणेशभाऊ कोळी,दिनेश बालघरे, सुधीर ढगे,बॉबीताई डिक्का, सपकाळे ताई तसेच देहूरोड शहर रा.काॅ.पक्षाचे सेलचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!