ताज्या घडामोडी
साखरी जयगड मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरी जयगड मराठी शाळेत साखर मोहल्ला गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री. विनायक जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी साखर मोहल्ला गावचे सरपंच श्री. यासिन मुजावर, उपसरपंच श्री. राजेंद्र जाधव, सदस्य श्रीमती. रबाब जांभारकर, सौ. पायल सावंत, साखर मोहल्ला गावाचे अध्यक्ष श्री. सुहास सावंत, उपाध्यक्ष श्री. सुधीर जाधव, सचिव श्री. मंदार सावंत, महिला अध्यक्ष सौ. आदिती सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. नंदिनी जाधव, अंगणवाडी सेविका सौ. मोहिते मॅडम, मदतनीस श्रीमती. दीपिका जाधव, सर्व पालक,
शाळेचे शिक्षक श्री. अमोल गायकवाड सर, मुख्याध्यापक श्री. संजीवन दराडे उपस्थित होते.