आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी..

भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हि केंद्र सरकार व राज्य सरकारकडे मागणी..

Spread the love

आवाज न्यूज: मावळ २७ ऑगष्ट अखिल मावळ तालुका जयंती महोत्सव आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे १०२ वा जयंती महोत्सव रविवार दि.२८.०८.२०२२

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी

चलो वडगाव मावळ !! जय लहुजी जय मातंग फकिरा चलो वडगाव मावळ !!! जय अण्णा अखिल मावळ तालुका जयंती महोत्सव आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे १०२ वा जयंती महोत्सव रविवार दि.२८.०८.२०२२ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त “भारतरत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हि केंद्र सरकार व राज्य सरकारकडे मागणी…

* स्थळ – पुजा गार्डन मंगल कार्यालय, वडगांव मावळ, जि. पुणे

   साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अखिल मावळ तालुका जयंती महोत्सव

मला लढा मान्य आहे, रडगाणे नाही

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज, समाज परिवर्तनकार शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, वीर लहुजी वस्ताद साळवे, मुक्ता साळवे यांच्या स्मृतीस अभिवादन करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे परिचय देत आहे.

१ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊंचा जन्म जि.सांगली, ता. वाळवा वाटेगाव येथे झाला. प्रतिभा आणि गुणवत्ता ही कोणा विशिष्ट जातीची अथवा धर्माची मिरासदारी कधीच असत नाही. हे. आपल्या वाणी लेखनितून सिद्ध करून दाखविणारे आंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यसम्राट म्हणजे अण्णाभाऊ साठे होय. त्यांचे मूळचे बालपणीतील नाव होते ‘तुकाराम’ एका अर्थाने ते गावकुसा बाहेरच्या दलित, भटके-विमुक्त यांची जीवनगाथा लिहिणारे गावकुसाबाहेरचे ‘तुकाराम’ ठरले. संत तुकारामांनी ‘तुकारामगाथा’ लिहीली तर वाटेगावच्या या तुकारामाने बहुजनांची ‘बहुजनगाथा’ आपल्या कथा कादंबऱ्यांतून मांडली. मुंबईतल्या कामगार चाळीत वाटेगावच्या ह्या तुकारामाचे नामांतर झाले आणि ‘अण्णाभाऊ साठे’ हे नाव सातासमुद्रापार अगदी जगभर विविध भाषांतील साहित्यातुन पोहचले.

समाज परिवर्तन घडू शकते. यावर अण्णाभाऊंचा ठाम “विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी एकूण ३२ कादंबऱ्या १४ कथासंग्रह ११ पोवाडे, १४ लोकनाट्ये, इनामदार नावाचे १ नाटक आणि शेकडो लावण्या, गीते ( क्रांतीगीते / वीरगीते: महाराष्ट्रगीते / कामगारगीते) लिहिली त्यांच्या एकूण ७ कादंबऱ्यांच्यावर इ. स. १९६१ पासून १९७० पर्यंत मराठी चित्रपट तयार करण्यात आले. ‘फकिरा’, ‘वारणेचा वाघ’ ‘अशी ही साताऱ्याची तन्हा’ ‘डोंगरची मैना’ ‘टिळा लावते मी रक्ताचा’ हे त्यातील काही चित्रपट त्याकाळी खूपच लोकप्रिय झालेले होते. यातील ‘वैजयंता’ अशी ही ‘साताऱ्याची तऱ्हा’ आणि ‘वारणेचा वाघ’ या चित्रपटांना महाराष्ट्र शासनाने विशेष पुरस्कारही मिळाले होते. ‘फकिरा’ या चित्रपटात अण्णाभाऊ स्वतः ‘सावळ्या मांग’ या दरोडेखोराची केलेली भूमिका अण्णाभाऊंच्यातील हरहुन्नरी अभिनेत्यांची अभिनयकला खूप काही सांगून जाते.

“लोकां घरी गायी-म्हसी आम्हा घरी उंदीर घुसी’ अशा पुर्वपरंपरागत चालत आलेल्या दारिद्रयात सारे आयुष्य जगुन सुद्धा चिरागनगरच्या ‘झोपडीतला हा महापुरूष’ ‘उपाशीपोटी तत्वज्ञान पचत नाही’ हा सिद्धांतही खोटा ठरवून या महाराष्ट्रात न्याय, समता, स्वतंत्र्य आणि बंधुभाव नांदण्याचे स्वप्न पहात राहिला. झोपडपट्टीतल्या बकालपणातही कार्ल मार्क्स, लेनिन, माओ टॉलस्टॉय, मॅक्झिम गार्की, सॉक्रेटिस, गौतम बुद्ध, म. फुले, राजर्षी छ. शाहु महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या साऱ्या जग बदलू पाहणाऱ्या विचारवंताच्या कार्यकर्तृत्वाचे, त्यांच्या तत्वज्ञानाचे स्वतः च्या मनाशी चिंतन, मनन अण्णाभाऊ करित होते.

अण्णाभाऊ साठे समाजभुषण पुरस्कार ..

राजाराम अस्वरे  दत्तोबा जाधव . तुकाराम खुडे (सामाजिक कार्यकर्ते, तळेगाव)

* अण्णाभाऊ साठे फकीरा पुरस्कार *

सचिन भांडे. संतोष शेंडगे , राजेंद्र कांबळे अण्णाभाऊ साठे जयंती मुक्ता साळवे पुरस्कार . स्नेहा राजगुरू. मिना बाळासाहेब शेलार. अश्विनी शेंडगे

समाजातील कार्याबद्दल विशेष पुरस्कार सन्मान : शंकर नामदेव बैरागर आकाश गोठे (सामाजिक कार्यकर्ते, चिंचोली) ॲड. माणिक भांडे राजाराम जाधव (संचालक वि. का. सो. ) दिपक लोंढे (संस्थापक लहूजी वस्ताद महा.राज्य) बजरंग जाधव (युवा नेते) विकास सातारकर (उपाध्यक्ष पि.चि. जयंती महोत्सव) (सामाजिक कार्यकर्ते, पुणे) लक्ष्मी पवार (अध्यक्ष जयमल्हार मित्र मंडळ) शांताराम आडागळे (सामाजिक कार्यकर्ते, धामणे)  शंकर शेंडगे (अध्यक्ष अण्णाभाऊ साठे पुणे शहर)  सविता आव्हाड (महिला अध्यक्षा पिं.चिं. जयंती महोत्सव) डॉ. उज्वला हतागळे (सचिव)  संतोष नेटके (सामाजिक कार्यकर्ते, चांदखेड) अशोक बोभाटे (सामाजिक कार्यकर्ता, लोणावळा) लक्ष्मण तांदळे (सामाजिक कार्यकर्ते, पुणे) (सामाजिक कार्यकर्ते, पुणे) (सामाजिक कार्यकर्ते पुणे)  अनिल गायकवाड (उपाध्यक्ष पिं.चिं.) अण्णा धगाटे ॲड. रजनीताई उकरडे (सामाजिक कार्यकर्ते) खंडू पवार  नितीन शेलार सर (पंडीत नेहरू विद्यालय कामशेत)  अनिल हतागळे (सामाजिक कार्यकर्ते, पुणे)  नंदा सुनिल लोंढे (सामाजिक कार्यकर्ते) श्री. शाहीर बापु पवार (सामाजिक कार्यकर्ते, पुणे) श्री. सोमनाथ पंचरास (अध्यक्ष आर.पी.आय. पुणे शहर) (नामांकीत शाहीर महाराष्ट्र राज्य) श्री. शाहीर बापू पवार

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अखिल मावळ तालुका जयंती महोत्सव  स्वागताध्यक्षः पंढरीनाथ आढाळगे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!