ताज्या घडामोडी

बिलकिस बानोच्या मोकाट बलात्काऱ्यांना गजाआड करा मागणीसाठी महीला राष्ट्रवादी काँग्रेस वाळवा तालुका व इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी संघटना च्या वतीने निवेदन

Spread the love

बिलकिस बानोच्या ११ बलात्काऱ्यांची गुजरात सरकाने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी सुटका केली असून त्यांना पुन्हा गजाआड करण्यात यावे या मागणीसाठी सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवार दिनांक २७ रोजी स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने व धरणे आंदोलन करणेत आले…
२००२ मध्ये गुजरातमध्ये जो नरसंहार झाला त्यापैकी बिलकीस बानो एक शिकार असुन तिच्यावर ११ जणांनी सामूहिक बलात्कार केला. ‍तिच्या तिन वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा खून करुन अवघे कुटुंब संपविले. परंतू हिंम्मत न हारता बिलकिस बानोने प्रदिर्घ न्यायालयीन लढा दिला. मुंबईमध्ये विशेष CBI न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने ११ जणांना जन्मपेठेची शिक्षा सुनावली. बिलकिसला न्याय मिळाला असे वाटले होते. परंतु देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात महिलांच्या सन्मानाच्या घोषणा सायंकाळ पर्यंत हवेतच विरळून गेल्या आणि गुजरात सरकारने बिलकिस बानोच्या ११ बलात्काऱ्यांची नियमबाहय सुटका केली. हे कृत्य केवळ असंविधानिकच नाही तर मानवतेला काळिमा फासणारे असून न्यायिक व्यवस्थेच्या चिंधडया उडवणारे आहे.
बलात्काऱ्यांची सुटका करण्याची नियमांमध्ये कुठलीही तरतूद नसताना गुजरात सरकाने हा निर्णय घेतला या संदर्भात केंद्र सरकारने लक्ष घालावे यासाठी वाळवा तालुका व इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी संघटनेतर्फे मा. तहसीलदार यांच्या कडे निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा अध्यक्ष सुष्मिता जाधव तालुका अध्यक्ष सुनीता देशमाने शहर अध्यक्ष रोझा किणीकर प्रदेश प्रतिनिधी कमल पाटील जिल्हा प्रतिनिधी शैलजा जाधव प्रतीभा पाटील. युवती अध्यक्ष विनीता सरचिटणीस उषा मोरे पंडीत उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!