आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

काय डोंगर….झाडी…हाटील…हा शहाजी बापूंचा डायलॉग

याच आधारावर मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथे घरगुती देखावा साकारण्यात आला आहे.

Spread the love

आवाज न्यूज: सतिष भेगडे, शेलारवाडी प्रतिनिधी. २ सप्टेंबर. 

महाराष्ट्रात काही दिवसांपुर्वी सत्तांतर झाले.सत्तांतराच्या काळात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील मात्र त्यांच्या डायलॉगमुळे चांगलेच प्रसिद्ध झाले होते. 

काय डोंगर….झाडी…हाटील…हा शहाजी बापूंचा डायलॉग सर्वांनाच पाठ आहे.आता याच आधारावर मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथे घरगुती देखावा साकारण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात हा डायलॉग फेमस झाला असून सतिश भेगडे यांनी घरगुती गणपतीच्या मखर सजावटीमध्ये या डायलॉगवर आधारित देखावा तयार केला आहे.गणपतीच्या आजूबाजूला उंच उंच डोंगर , झाडी व गुवाहाटी येथील रँडिसन हाँटेल दाखवलेले आहे.तसेच गुवाहाटी शहराविषयी प्रेम व्यक्त करणारे स्लोगन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून देशातील विविध राज्यांना सातत्याने मदतीचा हात देत असते.गुवाहाटी शहराचे पर्यटन वाढण्यासाठीही महाराष्ट्र राज्यच कारणीभूत ठरलेले असल्याने हा देखावा साकार केला असे  भेगडे परिवारा कडून सांगितले गेले.

हा देखावा शेलारवाडी परिसरातील आकर्षण ठरला असून देखावा पाहण्यासाठी नागरीक गर्दी करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!