आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्र

मावळातील फोक्सकाॕन व वेदांन्ता हा मोठा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा ? आमदार सुनिल शेळके यांचा युतीसरकारला सवाल?

बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी , शिवसेना आणि काँग्रेस च्या महाविकासआघाडी सरकारने प्रयत्न केल्याने तळेगाव येथे हा मोठा प्रकल्प होणार होता.

Spread the love

मावळातील फोक्सकाॕन व वेदांन्ता हा मोठा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा ? आमदार सुनिल शेळके यांचा युतीसरकारला सवाल?

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.१४(प्रतिनिधी )

मावळातील फोक्सकाॕन व वेदांन्ता हा मोठा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा ? आमदार सुनिल शेळके यांचा युतीसरकारला प्रश्न केला आहे.
नुकताच हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे समोर आल्याने आमदारांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना याबाबत भाष्य केले , या युती सरकारला प्रश्न विचारला आहे.

आमदार सुनिल  शेळके म्हणाले , ” वर्षभरापासून राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी , शिवसेना आणि काँग्रेस च्या महाविकासआघाडी सरकारने प्रयत्न केल्याने तळेगाव येथे हा मोठा प्रकल्प होणार होता.
फोक्सकॉन न आणि वेदांन्ता यांच्या माध्यमातून ११०० एकर जमिनीचे संपादनाचे काम चालू होते , त्यातील चारशेपन्नास ते पाचशे एकर जमिनीचे संपादन करण्यात आले , सुमारे तीन महिने काम वर्गीकरण करण्याचे काम सुरू होते.
अचानक तो प्रकल्प गुजरातला गेल्याचे समजले.! हा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प गेलाच कसा ? हा संशोधना.चा विषय आहे. याचा युती सरकाने छडा लावावा.

कारण या प्रकल्पामुळे सुमारे दीड लाख तरूणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या तसेच दोन लाख तरूणांना लहानमोठे उद्योग व्यवसाय करायला वाव होता.
महाराष्ट्र , कर्नाटक व तेलंगणा ही तीन राज्ये स्पर्धेत आसताना व गुजरात स्पर्धेत नसताना हा प्रकल्प गुजरातला गेला कसा ? तळेगाव आणि चाकण एमआयडीसी प्रकल्प एका बाजूला व हा प्रकल्प एका बाजूला अशी तुलना करता येईल. या दोन्ही प्रकल्पाएवढा मोठा प्रकल्प होता. मविआ सरकारने दोन्ही कंपनीशी करार करूनच पावले उचलली होती , हा प्रकल्प गुजरातला का गेला याचे उपमुख्यमंञी व मुख्यमंत्री यांनी जनतेला उत्तर द्यावे , असे शेळके म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!