आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्र

फाॕक्सकॉन वेदांन्ता प्रकल्प रद्द न करता तो परत आणावा , या मागणीसाठी युवासेनेतर्फे तहसिलदार यांना पञ..

युवासेना व शिवसेनेचे आजीमाजी पदाधिकारी यांनी तहसिलदार कचेरीवर मोर्चा काढला होता.

Spread the love

फाॕक्सकॉन वेदांन्ता प्रकल्प रद्द न करता तो परत आणावा , या मागणीसाठी युवासेनेतर्फे तहसिलदार यांना पञ..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.१४(प्रतिनिधी )

फाॕक्सकॉन वेदांन्ता सेमीकंडक्टर प्रकल्प रद्द न करता तो परत आणावा , या मागणीसाठी युवासेनेतर्फे तहसिलदार यांना पञ देण्यात आले.तत्पूर्वी युवासेना व शिवसेना आजीमाजी पदाधिकारी यांनी तहसिलदार कचेरीवर मोर्चा काढला होता.
युवासेना मावळ तालुका पदाधिकारी विजयभाऊ तिकोणे , माजी शिवसेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे , मावळ तालुका उपप्रमुख गबळु उर्फ आशीश ठोंबरे , सुरेश गायकवाड , युवासेना पुणेजिल्हा प्रमुख आनिकेत घुले , उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर , संतोष येवले , बाळासाहेब शिंदे , राजेश पळसकर, शेवंताबाई खंडागळे , रमेश जाधव, अमित कुंभार , विशाल दांगट, राम सावंत , उमेश गावडे , राहुल नखाते , पोपट राक्षे ,तानाजी सूर्यवंशी , निखिल येवले , अक्षय येळवंडे , दत्ता थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाविकासआघाडी च्या कार्य काळात उध्दवजी ठाकरे , यांचे नेतृत्वाखाली सरकारने तैवान येथील फाॕक्सकाॕन व वेदांन्ता कंपनीसोबत वाटाघाटी करून १लाख ५४ हजार कोटीची गुंतवणूक करण्यात येणारा सेमीकंडक्टर प्रकल्प आपल्या मावळ तालुक्यात तळेगाव एमआयडीसी मधे व्हावा ,यासाठी युवासेना प्रमुख तत्कालीन पर्यावरण व पर्यटनमंञी आदित्यजी ठाकरे व उद्योगमंञी सुभाष देसाई यांनी यशस्वी प्रयत्न केले.
या प्रकल्पामुळे मावळ तालुक्यातील व महाराष्ट्रातील १ लाख युवकांसाठी रोजगार उपलब्द होणार होता;परंतु नुकतेच महाराष्ट्रात सत्तांतर झाले , आणि शिंदे -फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाले.

काल हा प्रकल्प गुजरातला हलविण्यात आल्याचे समजले.
या निर्णयामुळे मावळ तालुक्याचा औद्योगिक व सर्वांगीण विकासाला खीळ बसणार असून एवढ्या मोठ्या प्रकल्पामुळे रोजगाराची संधीपासून मावळ व महाराष्ट्राच्या भूमिपुञांना वंचित ठेवण्याचे ‘ पाप ” या सरकारकडून झाले आहे.

आज आम्ही मावळातील भूमिपुञ तरूण व युवासेनेतर्फे या गुजरात धार्जिण्या सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करतो .सदर प्रकल्प पुन्हा मावळात यावा , यासाठी सरकारकडे या माध्यमातून निवेदन करीत आहोत.असे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!