आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी तर्फे गौरी सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न..

गौराई माझी' अर्थात घरगुती गौरी सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक 15 सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथील हॉटेल ईशामध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला.

Spread the love

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी तर्फे गौरी सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न..

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, १६ सप्टेंबर..

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी तर्फे घेण्यात आलेल्या ‘गौराई माझी’ अर्थात घरगुती गौरी सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक 15 सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथील हॉटेल ईशामध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व्याख्याते डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांना आमंत्रित करण्यात आले होते. दिनांक 4 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या गौरी सजावट स्पर्धेसाठी एकूण 25 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये गाव भाग व स्टेशन भागातून प्रत्येकी तीन बक्षिसे व गाव व स्टेशन भागातून सर्वोत्कृष्ट एक बक्षीस अशी एकूण सात बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेच्या दिवशी सर्व सहभागी स्पर्धकांना मानचिन्ह प्रदान करण्यात आले. व या पुरस्कार वितरण सोहळ्यात विजेत्या स्पर्धकांना रोटरी सिटीतर्फे मोमेंटो व साडी देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो.शरयू देवळे यांनी केले तर रोटरी सिटी चे अध्यक्ष रो दीपक फल्ले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

आली गौरी स्वप्नात….. या विषयावरील व्याख्याते डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांच्या व्याख्यानाला उपस्थितांणी भरभरून दाद दिली. याप्रसंगी पुरस्कारार्थी अनेक जणांनी आपले मनोगतही व्यक्त केले. या स्पर्धेची बक्षिसे फर्स्ट लेडी अँनस मालती फल्ले, अँनस अश्विनी शेळके व रो.रेशमा फडतरे यांच्यातर्फे पुरस्कृत करण्यात आली होती.

या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रो सुरेश शेंडे,अँनस सुनिता शेंडे, शालिनी कडलक,प्रिया नागरे,शितल ताये, वेणू कदम यांच्यासह रो.सुनंदा वाघमारे,रो.डॉ.धनश्री काळे, रो.संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे,किरण ओसवाल, डॉ.मिलिंद निकम, संजय मेहता, संतोष शेळके, भगवान शिंदे, मनोज ढमाले, संजय वाघमारे, चेतन पटवा, सुनील महाजन, तानाजी मराठे, प्रदीप टेकवडे, विश्वास कदम, प्रशांत ताये, सौरभ मेहता, रघुनाथ कश्यप, पांडुरंग जाचक, ज्येष्ठ सूत्रसंचालक अनिल धर्माधिकारी, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष मीराताई फल्ले यांच्यासह स्पर्धेत सहभागी स्पर्धक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अत्यंत देखण्या अशा या कार्यक्रमाची सांगता सुग्रास अशा अल्पोपहारणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन रेश्मा फडतरे यांनी तर आभार प्रदर्शन रोटेरियन शाहीन शेख यांनी केले. या सोहळ्यात गाव भागातून प्रथम क्रमांक कु.काव्या निलेश दवणी, द्वितीय क्रमांक सौ शुभांगी रायकर, तृतीय क्रमांक सौ दीपा गायकवाड गायकवाड यांना प्राप्त झाला तर स्टेशन भागातून प्रथम क्रमांक.  आदिती दिवसे,द्वितीय क्रमांक. आशा दाभाडे, तृतीय क्रमांक. रोहिणी शेलार यांनी पटकावला तर गाव व स्टेशन भागातून सर्वोत्कृष्ट देखाव्याचे पारितोषिक स्टेशन विभागात राहणाऱ्या, अनिता भेगडे यांनी पटकावले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी तर्फे सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!