आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कार्ल्यात डोळे तपासणी शिबिर संपन्न,नागरीकांचा उस्फूर्त सहभाग…

कै संजय उर्फ आवानाना हुलावळे प्रतिष्ठानच्या वतीने मोफत डोळे तपासणी व माफक दरात संपुर्ण शरीर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

Spread the love

कार्ल्यात डोळे तपासणी शिबिर संपन्न,नागरीकांचा उस्फूर्त सहभाग-:

आवाज न्यूज : लोनावळा भाऊ साहेब हुलावळे,  प्रतिनिधी.६ ऑक्टोबर.

कार्ला ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कै संजय उर्फ आवानाना हुलावळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन, साधु वासवानी ट्रस्ट,खंडाळा यांच्या विशेष सहकार्यातून व कार्ला ग्रामपंचायत व कै संजय उर्फ आवानाना हुलावळे प्रतिष्ठानच्या वतीने मोफत डोळे तपासणी व माफक दरात संपुर्ण शरीर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

जेष्ठ नागरीक बबन हुलावळे,छोटुभाई शेख,रविंद्र जांभुळकर,बाळु जंगम यांच्या हस्ते उद्घाटन करून शिबीरास सुरूवात करण्यात आली.

या शिबिरात शंभर पेक्षा जास्त नागरीकांची डोळे तपासणी करण्यात आली.तसेच पंचवीस नागरीकांनी आपले संपुर्ण शरीर तपासणी करून घेतले व दहा जणांना डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यास सांगण्यात आले, त्यासाठी संपुर्ण सहकार्य करण्याची खात्री देण्यात आली.

या शिबिरात कार्ला ग्रांमस्थाचा मोठा सहभाग लाभला तसेच पंचक्रोशीतील काही नागरीकांनीही या शिबीराचा लाभ घेतला.सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत चाललेल्या शिबीरासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब हुलावळे,उपाध्यक्ष विशाल जमदाडे, सचिव व ग्रामपंचायत सदस्या वत्सला हुलावळे,सुनिल सावळे,अजय मोरे, शिल्पा सावळे, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठानचे सदस्य सचिन किसन हुलावळे,रमेश जाधव सतिश मोरे,गणेश हनुमंत हुलावळे,राजु हुलावळे, यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिबीरास माजी सभापती शरदराव हुलावळे,कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली हुलावळे,माजी सरपंच सागर हुलावळे,ग्रामपंचायत सदस्या भारती मोरे,उज्ज्वला गायकवाड,ग्रामसेवक सुभाष धोत्रे,लिपिक शिवाजी म्हाळसकर, यांनी शिबीरास भेट दिली.कार्येक्रमाचे नियोजन कै संजय उर्फ आवानाना हुलावळे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!