आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या शहरात मोहंम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी..

मोहंम्मद पैगंबर मनमिळावू, सभ्यता, विनम्रता, प्रेमळ स्वभाव, शत्रूंना माफ करणे, द्वेषभावना न बाळगणे आदी विशेष गुण त्यांच्यात होते.

Spread the love

पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या शहरात मोहंम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी..

आवाज न्यूज : गुलाम अली भालदार, चिंचवड 09 ःः

मोहंम्मद पैगंबर मनमिळावू, सभ्यता, विनम्रता, प्रेमळ स्वभाव, शत्रूंना माफ करणे, द्वेषभावना न बाळगणे आदी विशेष गुण त्यांच्यात होते. त्यांच्या तोंडून विरोधकांविषयी कधीही अपशद्ब निघाले नाही. उलट ते त्यांच्याशी प्रेमानेच वागले, बोलले. सर्वश्रेष्ठ अल्लाहताअलाच या सृष्टीचा निर्माता आहे. त्याच्याइतका कोणीही श्रेष्ठ नाही, असे ते अपल्या प्रवचनातून उपदेश करीत असत. कितीही कठीण प्रसंग आले, तरी सत्याचा मार्ग सोडायचा नाही असे ते सांगत. यांच्या विचाराचे अनुकरण करण्यासाठी मुस्लिम बांधव मोहंम्मद पैगंबर यांची जयंती आज साजरी करण्यात आली. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तरी, मुस्लिम बांधवांना उत्साह टीकून होता.

पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या वतीने मिलिंदनगर येथील येथील लतिफिया मशिदीपासून अल्लाहचे प्रार्थना करून मौलाना नसीबुल्ला अजीजी यांच्याहस्ते झेंडा दाखवून मिरवणूकचा प्रारंभ करून डिलक्स चौक, जमतानी चौक, गेलॉर्ड चौक, साई चौक, शगुन चौक, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सांगता झाली. ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून युवकांनी मिरवणूकीत सामील झालेल्या मुस्लिम बांधवांना पिण्याचे पाणी, पेय जल, सरबत आदींचे वाटप केले. पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटीचे अध्यक्ष व इतर सर्व पदाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली याचे आयोजन केले. सर्वांना मिरवणुकीत सहभाग घेतला.

पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातून मिरवणूकीद्वारे पिंपरी येथे सर्व मिरवणूका दाखल झाल्या. त्यात अनेक स्वयंसेवी मंडळांचा सहभाग होता तसेच शहरातील विविध मशीदी व मदरशातील मौलानांचा मिरवणूक सहभाग होता. त्यासर्वांचा पिंपरी येथील सांगता कार्यक्रमात अनेकांचे सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रवचन देखील झाले. पिंपरी, काळेवाडी, पवनानगर, श्रीनगर, नढेनगर परिसरातून तर, नेहरुनगर, लांडेवाडी, भोसरी, दिघी, संततुकाराम नगर, कासारवाडी परिसरातून तसेच चिखली, कुदळवाडी, पवार वस्ती, जाधववाडी, घरकुल परिसरातून या परिसरातून दुचाकी, पायी, चारचाकी गाड्यातून मुस्लिम बांधव मोहंम्मद पैगंबराचा जयघोष करत पिंपरी येथे मिरवणूकीद्वारे एकत्र झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!