आरोग्य व शिक्षण

अध्यापक संघाचे आज धरणे आंदोलन ! सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी – निद्रिस्त शासनाला जागे करण्यासाठी आंदोलन – सागर पाटील

Spread the love

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करा या महत्त्वपूर्ण मागणीसाठी आज शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. रत्नागिरी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे

. दुपारी 3.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.शिक्षक आणि शिक्षण या दोन्ही घटकांप्रति शासनामध्ये मोठ्या प्रमाणात अनास्था आहे.सर्वसामान्य व बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी राज्यांमध्ये खासगीकरणाचा घाट मोठ्या प्रमाणात घातला जात आहे.सर्व विभागांचा पाया असणार्या शिक्षणाला अनुत्पादक घटक म्हणून हिणवलं जात आहे. शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राच्या समस्येकडे झोपेचे सोंग घेऊन दुर्लक्ष करणार्या शासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन केले जात असल्याचे मत रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी व्यक्त केले.
या आंदोलनाच्या निमित्ताने राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व शिक्षण आयुक्त यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.रत्नागिरी यांच्यामार्फत देण्यात येणार आहे. जुनी पेन्शन योजना सर्वांना सरसकट लागू करा या प्रमुख मागणीसह कोरोना काळात दिवंगत झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वारसांना तात्काळ अनुकंपा तत्त्वानुसार नोकरीत सामावून घ्या,सर्व विनाअनुदानित तत्त्वावरील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तात्काळ अनुदान लागू करा,वरिष्ठ व निवड श्रेणी मधील त्रुटी दूर करा,अर्धवेळ सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरण्यात यावी,शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत ,शिक्षकेतर चतुर्थश्रेणी प्रवर्गातील भरती प्रचलित धोरणानुसारच करा, ठोक मानधन रद्द करा,कार्यभारानुसार प्रत्येक शाळेत कला व क्रीडा शिक्षकांची विशेष पद तात्काळ भरा,वादग्रस्त संस्थांमधील मुख्याध्यापक व सर्व प्रकारच्या मान्यतेची अधिका शिक्षणाधिकाऱ्यांना द्या , वैद्यकीय प्रतिपूर्ती मध्ये चिकन गुनिया, स्वाइन फ्ल्यू ,डेंग्यू ,कोरोना व पोस्ट कोरोणा या आजारांचा समावेश करा, कोरोना काळातील रजा विशेष रजा म्हणून मंजूर करा , राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची शासनाकडे थकीत असणारी वेतन फरकाची बिले, वैद्यकीय प्रतिपूर्ती, वेतन आयोग फरकाची बिले तात्काळ अदा करा या महत्त्वपूर्ण मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचे अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष संभाजी देवकते व सचिव रोहित जाधव यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!