आरोग्य व शिक्षण

मयुरेश माने आंतरराज्य आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित….

Spread the love

मयुरेश विश्वास माने हे सध्या चिपळूण तालुक्यातील रत्नाकर शिक्षण संस्था दहिवली बु.|| संस्थेच्या रत्नसागर इंग्लिश स्कूल दहिवली बु. या प्रशालेत २००९ पासून सहा.शिक्षक म्हणून काम करत आहेत. आता मयुरेश माने सर यांना NATIONAL RURAL DEVELOPMENT FOUDATION (REG) BELGAVI HEALTH AND NATURE DEVELOPMENT SOCIETY BELAGAVI या संस्थेकडून आंतरराज्य आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार शनिवार दि.०८.१०.२०२२ रोजी धर्मनाथ नगर , धर्मनाथ सर्कल , अशोक नगर गँगवाडी बेळगाव याठिकाणी कर्नाटक, महाराष्ट्र, आणि गोवा राज्यातील शिक्षण अधिकारी , राजकीय नेते , यांच्या उपस्थितीत देवून सन्मानित करण्यात आले. या संस्थेचे पुरस्कार वितरण करण्याचे तिसरे वर्ष आहे. यावर्षी एकूण 150 व्यक्तींचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
NATIONAL RURAL DEVELOPMENT FOUDATION (REG) BELGAVI HEALTH AND NATURE DEVELOPMENT SOCIETY BELAGAVI ही संस्था कर्नाटक, महाराष्ट्र, आणि गोवा राज्यातील उल्लेखनीय व्यक्तींच्या कामाची दखल घेवून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, बांधकाम क्षेत्रातील कामासाठी गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले जाते. सन्मान चिन्ह , अभिनंदन पत्र , सन्मान पत्र , म्हैसूर फेटा , चंदनाचा हार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
उपक्रमशील शिक्षक मयुरेश माने यांना मागील महिन्यात MIE EXPERT 2022 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मानेसर हे शाळेत व समाजातील विविध उपक्रम राबवत असतात. आणि सक्रीय सहभाग नोंदवत असतात. मागील शैक्षणिक वर्षात त्यांनी परमजीत धिल्लोन आणि भगवंत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या RISE UP 4 EWASTE या ई- कचरा बाबत प्रकल्पाचा जगात प्रथम क्रमांक आला आहे. तसेच ते राज्यभरात उत्तम तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहे. त्याचप्रमाणे ते कवी म्हणूनही परिचित आहेत. त्यांचा एक पाऊस मनातला हा कवितासंग्रह प्रकाशित आहे. लवकरच त्यांचा हिंदी कवितासंग्रह प्रकाशित होणार आहे. म्हणूनच त्यांनी आजवर केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आंतरराज्य आदर्श शिक्षक गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल श्री.माने यांचे संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!