आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

तळेगावच्या सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगले वार्षिक स्नेहसंमेलन.

वार्षिक स्नेहसंमेलनात रक्ताच्या नात्याबरोबरच मनाची नाती देखील कशी जपायची असतात याचा उत्तम संदेश देण्यात आला.

Spread the love

तळेगावच्या सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगले वार्षिक स्नेहसंमेलन. वार्षिक स्नेहसंमेलनात रक्ताच्या नात्याबरोबरच मनाची नाती देखील कशी जपायची असतात याचा उत्तम संदेश देण्यात आला.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २९ डिसेंबर.

तळेगाव दाभाडे:सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन’ उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन
ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार , माजी मुख्याध्यापिका ज्योती चोळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे संस्थापक गणेश भेगडे, अध्यक्ष सुनील भेगडे, सचिव दत्तात्रय नाटक, शालेय समिती अध्यक्ष रामराव जगदाळे, ज्येष्ठ संचालक अशोक भेगडे , मिलिंद पोखरकर,बी.एम. भसे, विलास भेगडे, अरुण भेगडे पाटील , संतोष दाभाडे, खंडूजी टकले, संतोष भेगडे, मुख्याध्यापिका रंजीता थंपी, उपमुख्याध्यापिका कोमल पेंडसे, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘रिश्ते द कलर्स ऑफ लाईफ’ या संकल्पनेवर आधारित विविधगुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. रक्ताच्या नात्याबरोबरच मनाची नाती देखील कशी जपायची असतात याचा उत्तम संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनातून आपल्या कला सादर केल्या.रंजीता थंपी यांनी अहवाल वाचन केले.उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून साची मन्वर व कीर्ती नंदवरम यांना सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षिका म्हणून यशश्री आलम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गणेश भेगडे, ज्योती चोळकर,विवेक इनामदार यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!