मावळसामाजिक

गोपीनाथराव म्हणायचे, कोळशाच्या खाणीत काम करूनही निश्कलंक राहिलेला हिरा म्हणजे आमदार दिगंबरशेठ भेगडे :उपमुख्यमंञी देवेंद्रजी फडणवीस.

Spread the love

गोपीनाथराव म्हणायचे, कोळशाच्या खाणीत काम करूनही निश्कलंक राहिलेला हिरा म्हणजे आमदार दिगंबरशेठ भेगडे :उपमुख्यमंञी देवेंद्रजी फडणवीस.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी २८ डिसेंबर.

गोपीनाथराव म्हणायचे, कोळशाच्या खाणीत काम करूनही निश्कलंक राहिलेला हिरा म्हणजे आमदार दिगंबरशेठ भेगडे ! पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी, असे हे व्यक्तिमत्व असणारे स्व.दादा तथा दिगंबरशेठ भेगडे यांनी पंढरीची, देहू, आळंदीची वारी कधी चुकविली नाही, भंडारा डोंगरावर संत तुकोबांचे भव्यदिव्य मंदिर उभारणीसाठी ते बाळासाहेब काशीद यांचे मागे भक्कम उभे राहिले ! माञ त्यांचे कळस पाहण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले, माञ स्वतःच्या शिल्पापेक्षा तुकोबांचे मंदिर महत्वाचे वाटायचे, उपमुख्यमंञी देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रतिपादन केले.

माजी आमदार वैकुंठवासी दिगंबरशेठ बाळोबा भेगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त व स्मारकाचे लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंञी व माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे कुंडमळा (येथील ) पुण्यस्मरणानिमित आयोजित जेष्ठ कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तनानंतर वैकुंठवासी दिगंबरशेठ भेगडे यांचे कार्याबाबत आढावा घेताना बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर केँद्रीय रेल्वेमंञी रावसाहेब दानवे , राज्याचे उच्चवतंञशिक्षणमंञी चंद्रकांत दादा पाटील , मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे, आमदार राहुल कूल, आमदार उमाताई खापरे , जिल्हाध्यक्ष गणेशतात्या भेगडे, शंकरराव शेलार, शंकरराव जगताप, हभप. समाधानमहाराज शर्मा, हभप.मारूतीबुवा कु-हेकर, हभप पंकजमहाराज गावडे, हभप.सुदाम महाराज, पुणे पीपल्स अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, आमदार आशाताई बुचके, मावळ विधानसभा प्रचारप्रमुख रविंद्र आप्पा भेगडे, सहकार महर्षी माऊली दाभाडे, माजी जिल्हापरिषद सदस्य चंद्रकांत सातकर,  रघुवीर शेलार, भेगडे कुटूंबातील मान्यवर मनोहर भेगडे, प्रशांत भेगडे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंञी.फडणवीस म्हणाले,
दादा कै.दिगंबरशेठ भेगडे हे ख-या अर्थाने समर्पक जीवन जगले. त्यांचेबरोबर मला दहा वर्षे काम करता आले, ज्यांच्या कडून काही कामकाज शिकता आले. त्यांच्याकडून काही प्रेरणा मिळाली, त्यांच्यासारखं व्यक्तिमत्त्व असावं असे वाटते.

धरणग्रस्तांचे प्रश्न , मिसाईलसाठी जमिनी दिल्या, त्या येथील शेतक-यांचे मोबदला मिळण्याबाबतच्या प्रश्नासाठी त्यांनी प्रयत्न केले.भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांचे पदस्पर्शाने पावन भूमित भव्यदिव्य मंदिराचे उभारणीसाठी ते बाळाहाहेब काशिद यांचे पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. हा प्रकल्प आपण हायपाॕवर कमिटीसमोर नेतोय, त्या माध्यमातून सरकारचा हातभार लागेल.
स्वतःच्या स्मारकापेक्षा त्यांना तुकोबांच्या स्मृती महत्वाच्या होत्या. ते काम ज्या दिवशी पूर्ण होईल, त्या दिवशी स्व.दिगंबरदादा यांना आदरांजली ठरेल !

यावेळी बोलताना , माजी पालकमंञी व उच्चवतंञशिक्षणमंञी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, संपूर्ण जग एकाच गुणाचे आग्रही आहेत, ते म्हणजे नम्रपणा ! इतके वाकायचे , की मोडेल की काय असे वाटेल, पण निवडून आल्यावर ताठपणा ! ! असे काहींचे वागणे असते.असे दिगंबरदादा भेगृडे नव्हते ! दहा वर्षे आमदार असूनही , कधीही अभिमान नसलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे दिगंबरदादा भेगडे होय !

मला पदवीधरचे तिकिट २००७ मध्ये मिळाले, तेव्हा माझ्याबरोबर गावोगावी फिरणारे दिगंबरदादा यांनी गावोगावी रस्त्याने जाताना काच खाली घेऊन चौकशी करूनच पुढे जायचे ! घरून डबा घेवून जाणारे ! तोही एकट्यापुरता नाही, पाच सात लोकांना पुरेल इतका ! मी जेवूण घेतो, तुम्ही बसा ! असे नाही, तुम्हीही या आपण जेवू ! असे प्रेम ते कार्यकर्त्यांवर करीत.अधिका-यांचे वर न रागावता, ते प्रेमाणे काम करून घेत.अधिकारी यांचेशी कधीही रागाने बोललेले त्यांना पाहिले नाही. त्यांची वारी कधी चुकली नाही. वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित पाच दहा हजार लोक जेवले पाहिजेत, असा त्यांचा स्वभाव होता.

दिगंबरशेठ यांनी ज्या ज्या कल्पना केल्या ती कामे पूर्ण करण्याचे काम आपले सर्वांचे आहे.
यावेळी , केँद्रीय रेल्वेमंञी रावसाहेब दानवे म्हणाले, स्व.दिगंबरदादा भेगडे यांचा पिंड सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कामाचा होता. ते ज्यावेळी विधानसभेला उभे असताना एक घोषणा देण्यात आली. पंढरीचा वारकरी ! विधानसभेचा मानकरी ! ! आणि लोकांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. घोषणादेखील प्रचारात महत्वाची असते.जेव्हा प्रमोदजी महाजन यांनी मला एका उमेदवाराकडे पाठवले , तेव्हा त्या उमेदवाराचे पञ्याचे घर, दोन शेळ्या ! माञ त्याला उभे केले ! प्रचारात खासदार ,आमदार बापलेक असताना विरोधक साधा शेतकरी असूनही, घोषणेमुळे त्यासनिवडून आणले.ते पुढे म्हणाले , ”
दादांनी जी कामे हाती घेतली, पण अपूर्ण राहिली, त्यासाठी आपण शंभरटक्के भेगडे कुटूंबाचे पाठीशी राहू. आपण माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे यांचेकडून या प्रश्नावर पाठपुरावा करू.

रविंद्र भेगडै यांनी प्रास्ताविक करताना पुंडलीक वरदे हरी विठ्ठल ! असा गजर करून, स्व.दिगंबरशेठ भेगडे यांचे सकाळी एखादा दशक्रियाविधी, दुपारी एखादा साखरपुडा, राञी लग्न समारंभ असा नेम व पंढरी, आळंदी, देहू ची वारी न चुकविणारे आणि बाहेरून येताच पहिले गोठ्यात गाईला गोंजारणारे, शेतातील कामाची विचारपूस करणारे एक उत्तूंग व्यक्तीमत्व होते.देवेंद्रजी आपण आलात, पण मी निरूत्तर झालो आहे, असे बोलले.

माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे म्हणाले , ” देवेंद्रजी मिसाईल प्रकल्पासाठी आमच्या भेगडे कुटूंबातील पाचशे एकर जमिनी सरकारने घेतल्या, त्यांचा मोबदला तेव्हढा मिळाला, तर बरे होईल, केँद्राकडे प्रस्ताव पडून आहे.तसेच येथे होणाऱ्या रस्त्याला व इंद्रायणीनदी वरील पुलाला.स्व.दिगंबरदादा बाळोबा भेगडे असे नामकरण करण्याचे प्रस्तावाला आपण सभेत मंजुरी द्यावी, असे भाषण केले.

यावेळी समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तनातून त्यांनी लोक किर्तन विकत घेतील, पण कीर्तनकाराला नाही. दिगंबरदादा भेगडे यांचे इतके मोठे कार्य होते, की ते साधे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य असतानाही विधानसभेवर निवडून गेले, ही वारकरी यांची ताकद आहे.
त्यांचे सुपुञ मनोहरदादा यांनी तारीख घेतल्यापासून अतिशय नम्रपणे माझ्याशी संपर्क साधत मला कीर्तनाला यायला भाग पाडले. काही लोक वागतात, तसे यांनी स्वभावात दाखवले नाही.आभार भेगडे यांचे भाचे रघुवीर शेलार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!