ताज्या घडामोडी

बहुजन समाजाने डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारावर शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी -प्रवीण काकडे

Spread the love

बहुजन समाजाने डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारावर शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी ==प्रवीण काकडे बहुजन समाजाने डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन शैक्षणिक क्षेत्रात काम करावे असे प्रतिपादन प्रविण काकडेसाहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांनी केले ते आज अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ च्या वतीने आयोजित डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त ऊसतोड मजूर यांच्या झोपडीवर जाऊन मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते काकडे पुढे म्हणाले की आजही बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला असून गोरगरीब वंचित घटक यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट च्या वतीने शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत यावर्षी ट्रस्ट च्या वतीने १५४९ विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असून आज डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ५५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमास पत्रकार शरद गाडे सतिश थोरात कराड तालुका अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ अँड बनसोडेसाहेब साप्ताहिक कराडचे संपादक संतोष वांयदडे अशोक काकडे पाटोदा सर्व विद्यार्थी ऊसतोड मजूर महिला उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!