महाराष्ट्र

मावळचे तहसिलदार पदाचा व अधिकाराचा गैरवापर करत न्यायालयीन निर्णयात बेकायदेशीरपणे आदेश पारित केल्याचा आरोप करत त्यांच्या त्वरित निलंबनाची मागणी…

उपविभागीय अधिकारी मावळ संदेश शिर्के, तहसिलदार मावळ मधुसूदन बर्गे , मंडलाधिकारी वडगाव , गावकामगार तलाठी सांगवी , यांना त्वरित निलंबित करावे. नाही तर आम्ही दि 15/11/2022 रोजी तहसिलदार कार्यालय वडगाव मावळ येथे पिडीत शेतकऱ्यांसह " बेमुदत उपोषणाला " बसणार.. सुर्यकांत काळोखे...

Spread the love

 

मावळचे तहसिलदार पदाचा व अधिकाराचा गैरवापर करत न्यायालयीन निर्णयात बेकायदेशीरपणे आदेश पारित केल्याचा आरोप करत त्यांच्या त्वरित निलंबिची मागणी…

आवाज न्यूज :  राजेश बारणे,  तळेगाव दाभाडे वार्ताहर,८ नोव्हेंबर..

तहसिलदार मावळ मधुसूदन बर्गे यांनी शेत जमीन न्यायाधिकरण मावळ मध्ये दाखल केसेस मध्ये कोणतेही कागदोपत्री पुरावे न पाहता, जुने आदेश ,शासकिय नियम कायदे न पाहता, केवळ पोकळीस्ट नोंदीचा गैरफायदा घेत पदाचा व अधिकाराचा गैरवापर करत बेकायदेशीरपणे अनेक आदेश पारित केले आहे. तसेच तहसिलदार मावळ यांनी केसेस चालवताना कुळकायदा 1966 चे तरतुदीच्या विरुद्ध निष्कर्ष काढत व चुकीच्या पद्धतीने व बेकायदेशीर पणे अनेक प्रकरणात आदेश पारित करून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. असा आरोप करत अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, मावळ तालुक्याच्या वतीने तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या त्वरित निलंबनाची मागणी करण्यात आली.

यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, मावळ तालुका अध्यक्ष ॲड. संजय पाटील, कार्याध्यक्ष जमीर नालबंद, तळेगाव शहर उपाध्यक्ष नवनाथ कुल आणि पिडीत शेतकरी सुर्यकांत काळोखे उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना या बाबत “अण्णा हजारे प्रणित” भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास कडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने आम्ही मा. तहसिलदार मावळ मधुसूदन बर्गे यांचे विरुद्ध मा. सौरव राव साहेब विभागीय आयुक्त पुणे विभाग, व मा जिल्हाधिकारी पुणे राजेश देशमुख साहेब यांचे कडे समक्ष भेटून अनेक प्रकरणांची कागदोपत्री पुराव्यानिशी तक्रार अर्ज दिलेले असल्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे तहसिलदार मावळ मधुसूदन बर्गे हे बेकायदेशीर पणे कशा प्रकारे न्याय निवाडे करत आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणून सांगवी येथील क्र तमक/32ग/एस आर/ 29/2018 हे प्रकरण असून त्याची सविस्तर माहिती व घटनाक्रम देत आहे.

तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मावळ या मध्ये क्र तमक / 32ग/एस आर/29/2018 या प्रकरणात गाव मौजे सांगवी येथील गट न 66 हि संपुर्ण मिळकत मूळ मालक व वहिवाटदार यांचेकडून सुर्यकांत हरिभाऊ काळोखे यांनी रजी. खरेदीखताने खरेदी केली होती व सन 2002 पासून आजपर्यंत सदर जमीन खरेदी व मालकी हक्काने ताबे वहिवाट करत आहेत.

असे असताना तहसीलदार मावळ तथा शेतजमीन न्यायाधिकरण मावळ मध्ये मौजे सांगवी ता मावळ येथील गट न 66,146,69 बाबत 32ग अन्वये किंमत ठरवून मिळणे बाबत सन 2018 मध्ये काही तिर्हाइत इसमाने अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात अर्जदार यांनी गट नं 66 चे मालक सुर्यकांत हरिभाऊ काळोखे यांना प्रकरणी पक्षकार केलेले नाही, अथवा त्यांचे मालकीचे जमिनीबाबत कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही असे असताना सुर्यकांत काळोखे यांचे नाव कमी झाले असल्याने आम्ही प्रकरणाची सर्व कागदपत्रांची पडताळणी केली असता अनेक गंभीर बाब समोर आल्या त्या पुढील प्रमाणे,सदर तमक/32ग/एसआर/29/2018 या प्रकरणात 24/11/2021 रोजी मा तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी 32 एम चे प्रमाणपत्र देण्याचे आदेश पारित केले , त्या आदेशा विरुद्ध या प्रकरणातील गट 69 चे मालक जोशी यांनी उपविभागीय अधिकारी मावळ येथे 15/11/2021 रोजी रीतसर अपिल दाखल करत दि 23/11/2021 रोजी तहसिलदार मावळ यांचे आदेशास अंतिम निकाल पर्यंत स्थगिती मिळवली

असे असताना मा तहसिलदार मावळ मधुसूदन बर्गे यांनी 24/11/2021 रोजी 32 एम चे प्रमाणपत्र देण्याचे आदेश पारित करत उपविभागीय अधिकारी मावळ यांचे आदेशाचा अवमान केला. दि 1/12/2021 रोजी 17/09/2021 चे तहसीलदार मावळ यांचे आदेशास स्थगिती असताना फेरफार क्र 1286 ची नोंद 7/12 ला गावकामगार तलाठी सांगवी यांनी नोंद घेतली, 10/12/2021 रोजी मंडलाधिकारी वडगाव यांनी नोंद प्रमाणित केली . त्यामुळे सुर्यकांत काळोखे यांचे मालकी हक्कातील नाव कमी झाले,

दरम्यानच्या काळात 32 एम सर्टिफिकेट प्राप्त लोकांनी विक्री परवानगी करिता उपविभागीय अधिकारी मावळ यांचे कडे दि 15/12/2021 रोजी अर्ज केला, त्या अर्जाच्या अनुषंगाने स्वतः स्थगिती आदेश दिलेले असताना उपविभागीय अधिकारी मावळ यांनी गावकामगार तलाठी यांना दि 22/12/2021 रोजी दवंडी अहवाल सादर करणे बाबत पत्र दिले, व , उपविभागीय अधिकारी मावळ यांनी स्वतः शेतजमीन न्यायाधिकरण तथा उपविभागीय अधिकारी मावळ यांच्या स्थगिती आदेश चा अवमान केला, असे , तसेच स्थगिती आदेश असताना दि 31/12/2021 रोजी गावकामगार तलाठी सांगवी यांनी दवंडी अहवाल सादर केला .

उपविभागीय अधिकारी मावळ/ मुळशी यांनी क्र तमक/32ग/एसआर/29/2018 या तहसिलदार मावळ यांचे विरोधात केलेले अपिल दि 07/04/2022 रोजी फेटाळले, व उपविभागीय अधिकारी मावळ यांचे आदेशाची अपिल मुदत संपणे पूर्वीच दि 12/ 04/2022 रोजी कुळकायदा कलम 43 चा शेरा कमी करून गट क्र 66,146,69 या जमिनी खालसा करत विक्री परवानगीचे आदेश पारित केले, व दि 19/04/2022 रोजी कोंडाबाई वाडेकर व इतर यांनी सदर जमीन विकून टाकली.अशा प्रकारे सुर्यकांत काळोखे यांची जमीन प्रकरणी पक्षकार नसताना व त्यांना कोणतीही आगाऊ सूचना न देता जमीन परस्पर विकली गेली. आम्ही सखोल माहिती घेतली असता व तहसिलदार मावळ यांचे कार्यकाळात झालेल्या अनेक आदेशाची पाहणी केली असता कागदपत्रे पडताळणी केली असता आम्हाला अनेक प्रकरणात मोठया प्रमाणात अनियमिता व गैरप्रकार झाले बाबत निदर्शनास आले आहे, या बाबत आम्ही मा.मुख्यमंत्री कार्यालय मुंबई, मा. महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई , विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, विभाग, मा.जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, यांचे कार्यालयात समक्ष भेटून तक्रार अर्ज दिलेले आहेत.

मा.जिल्हाधिकारी पुणे यांनी आमच्या तक्रार अर्जाची गंभीर दखल घेत कुळकायदा शाखा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांना मा. तहसिलदार मावळ मधुसूदन बर्गे यांनी त्यांचे कार्यकाळात तहसिलदार मावळ तथा शेतजमीन न्यायाधिकरण मावळ यांच्या सर्व न्यायालयीन प्रकरणाची चौकशी पथक नेमून चौकशी करून स्वयंस्पस्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आद्यपर्यंत चौकशी पथक मावळात दाखल झालेले नाही.

आमची आपणास विनंती कि सदर प्रकरणाची व तहसिलदार मावळ यांनी त्यांचे कार्यकाळात दिलेल्या सर्वच न्यायालयीन निर्णय व आदेशांची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
तसेच जो पर्यंत सदर भ्रष्ट अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होऊन कारवाई होत नाही तो पर्यंत उपविभागीय अधिकारी मावळ संदेश शिर्के, तहसिलदार मावळ मधुसूदन बर्गे , मंडलाधिकारी वडगाव , गावकामगार तलाठी सांगवी , यांना त्वरित निलंबित करावे. नाही तर आम्ही दि 15/11/2022 रोजी तहसिलदार कार्यालय वडगाव मावळ येथे पिडीत शेतकऱ्यांसह ” बेमुदत उपोषणाला ” बसणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यासंदर्भात तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. तहसीलदार काय प्रतिक्रिया देतात हे पहाणे महत्वाचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!