आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

विठ्ठल मंदीर नीळकंठ नगर तळेगांव दाभाडे येथे  तुळशीचा विवाह संपन्न…

विठ्ठल मंदीर नीलकंठ नगर तळेगांव दाभाडे येथे, संपूर्ण महिनाभर काकडा आरतीचे नियोजन केले होते..

Spread the love

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर,१० नोव्हेंबर.

 

विठ्ठल मंदीर नीलकंठ नगर तळेगांव दाभाडे येथे, संपूर्ण महिनाभर काकडा आरतीचे नियोजन केले होते, तळेगाव व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आरतीला हजेरी लावून आपली उपस्थिती लावली. रेणुका महिला भजनी मंडळ व निळकंठ नगर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वतिने नियमितपणे भजन, कीर्तन, प्रवचन, करत हा सोहळा आनंदमय वातावरणात पार पाडला.

तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदीर नीळकंठ नगर तळेगांव दाभाडे येथे  तुळशीचा विवाह संपन्न झाला.पुरोहित काकांनी मंगलाष्टके म्हणत लग्न सोहळा पार पाडला, त्यावेळी उपस्थितांनी अक्षता टाकून विवाह सोहळ्याचा आनंद घेतला. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचा उपस्थितांनी लाभ घेतला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!