आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीय

अखिल भारतीय वारकरी मंडळाची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर.

मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके यांच्या अध्यक्षतेखालीआणि सहजिल्हाध्यक्ष विजय महाराज पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्याने मावळ तालुका अध्यक्ष म्हणुन शांताराम महाराज बोडके यांच्यासह पन्नास पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहिर....

Spread the love

अखिल भारतीय वारकरी मंडळाची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर.

आवाज न्यूज: मावळ प्रतिनिधी, १० नोव्हेंबर.

गहुंजे -मावळ तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जुन्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्याने मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके यांच्या अध्यक्षतेखालीआणि सहजिल्हाध्यक्ष विजय महाराज पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्याने मावळ तालुका अध्यक्ष म्हणुन शांताराम महाराज बोडके यांच्यासह पन्नास पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहिर करून त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

वारकरी सांप्रदायात मावळ तालुक्यात अखिल भारतीय वारकरी मंडळाचे संघटन मोठ्या प्रमाणात असुन मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजीक उपक्रम राबविले जातात . त्यात प्रामुख्याने शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, वारकरी शिक्षण, व्यसनमुक्ती, आरोग्य, गोरक्षा आदींसह पर्यावरण आणि गरीब – गरजुंना मदत केली जाते.हे कार्य अविरत चालू रहावे म्हणुन गाव तेथे अखिल भारतीय वारकरी मंडळाची शाखा स्थापन करण्यात येणार असल्याचे जिल्हा सहसचिव दिनकरबुवा निंबळे यांनी सांगितले.

कार्यकारीणी – शांताराम बोडके (अध्यक्ष), लक्ष्मण तळावडे( मुख्यसचिव ), नारायण केंडे (कोषाध्यक्ष ) सचिन ठाकर(प्रसिद्धी प्रमुख) अनुसया म्हस्के ( मार्गदर्शक ) वारकरी शिक्षण समिती नंदाराम जाधव, संजय बांदल, विश्वनाथ वाळुंजकर .स्वच्छता व व्यसनमुक्ती समिती. नंदाराम धनवे, बळीराम ढोले, शंकर मराठे.सार्वजनिक मंदिर समिती. शिवाजी राक्षे, सुखदेव गराडे, संजय खेंगले, बाजीराव ढोरे .सप्ताह व दिंडी समिती. बाळासाहेब गायकवाड, शंकर ढोरे, संजय ढोरे. वारकरी सेवा समिती. गोरख घोजगे, लक्ष्मण काळे, बाबासाहेब गाडे, योगेश भांगरे, महिला व बालसंस्कार समिती. संगिता फाळके, छाया काकरे, सुमन घरदाळे, सारीका निकम, सुषमा ओझरकर, कमल काकरे, मालन ढोरे, लक्ष्मी पऱ्हाड , सखु तिकोणे .युवा समिती. भाऊसाहेब काटे, शंकर लोहोर, भाऊसाहेब आंभोरे, गोरख तरस .आरोग्य समिती. आत्माराम शिंदे, विलास घारे, उद्धव कारके, शांताराम वायभट . काशिनाथ भोंडवे, साहेबराव देशमुख, जगन्नाथ घारे, गणेश घोजगे
यावेळी कोषाध्यक्ष भरत वरघडे, दतोबा भोते, नियोजन समिती सदस्य कुलदीप बोडके, तुकाराम भांगरे, विजय गाडे, दत्ता कड , सोपान खराबी या मंडळाच्या वरीष्ठ पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वारकरी उपस्थित होते. आत्माराम शिंदे यांनी सुत्र संचालन तर दिनकर निंबळे यांनी आभार मानले . कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!