महाराष्ट्र

ठाकरे गटाला मोठा धक्का ; दिग्गज नेता शिंदे गटात दाखल..

Spread the love

ठाकरे गटाला मोठा धक्का ; दिग्गज नेता शिंदे गटात दाखल
आवाज न्यूज : वार्ताहर,मुंबई  १२ नोव्हेंबर.. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदार गजानन कीर्तिकर गेल्या काही दिवसांपासून सध्या कोणता झेंडा घेऊ हाती या भूमिकेत दिसून येत होते. अखेर रविंद्र नाट्य मंदिर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला जय महाराष्ट्र केला आहे.

खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
कीर्तिकरांनी शिंदेंची साथ दिल्याने आता त्यांच्यासोबत असलेल्या लोकसभा खासदारांची संख्या १३ वर गेली आहे, तर राज्यसभेचे तीन खासदार धरुन ठाकरेंकडे ९ खासदार राहिले आहेत.

यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या बैठकीला कीर्तीकर यांची अनुपस्थिती सर्वांच्याच भुवया उंचावणारी ठरली विशेष म्हणजे यापूर्वी गटप्रमुखांच्या मेळाव्याला उपस्थित असताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी अशीच प्रतिक्रिया गजानन कीर्तिकर यांनी दिली होती. शुक्रवारी पुन्हा एकदा किर्तीकर आणि शिंदे एकत्र दिसल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!