क्राईम न्युजक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

सातारा येथे भेकर व चौसिंगा या वन्यप्राणीची शिकार..

आसाम रायफल या मिलिटरी मधील रायफलमॅन युवराज निमन यांना व इतर दोन जणांना अटक.

Spread the love

सातारा येथे भेकर व चौसिंगा या वन्यप्राणीची शिकार

आसाम रायफल या मिलिटरी मधील रायफलमॅन युवराज निमन यांना व इतर दोन जणांना अटक.

आवाज न्यूज: सातारा, १४ नोव्हेंबर.

आज दि.14.11.2022 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे उपवनसंरक्षक सातारा महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल डॉ निवृत्ती चव्हाण, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे व इतर वनपाल व वनरक्षक , पंच असे सर्वांनी मिळून माची पेठ येथे असलेल्या श्री वास्तू अपार्टमेंट मध्ये असलेल्या A4 सदनिका मध्ये रहात असलेल्या युवराज निमन यांच्या राहत्या घरावर छापा मारले असता राहत्या घरात भेकर, व चौसिंगा या दोन वन्यजीव प्राणी यांचे मुंडके व भेकराचे ताजे मटण व पायाचे खुर सापडले.

अधिक चौकशी युवराज निमन याच्याकडे केले असता त्याने सदर शिकार ही ठोसेघर येथील नारायण सिताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर, व मी (युवराज निमन) यांनी मिळून शिकार केले.
नारायण यांच्याकडे असलेल्या सिंगल बोअर बंदुकीने आज सकाळी साधारण 7.30 वाजता भेकर याची शिकार बंदुकीने केली , व भेकर चेटकीच्या ओढ्यात सोलून त्याचा मटणाचे वाटे केले, त्या पैकी आज सकाळी एका भेकराचे मुंडके व थोडे मटण हे युवराज निमन याला दिले, कातडे सोलून ओढ्यात लपविले, व उरलेले मटण पैकी थोडे मटणाचा वाटा विठ्ठल बेडेकर याला दिला तर उर्वरित सर्व मटण हे नारायण यांनी स्वतःच्या घरी घेऊन आले.

नारायण ह्यांनी सर्व मटण स्वतःच्या घरात एका पिशवीत घालून सदर पिशवी घरामागील खोलीत शेणीच्या खाली लपवून ठेवले होते. सदर मटण हे सातारा मध्ये कोणा बड्याहस्तीला देण्यासाठी लपवून ठेवले होते, व ते मटण हे रात्री घेऊन जाणार होता असे नारायण यांनी सांगितले.
सदर तीन आरोपीना वन विभागाने शिताफीने सातारा व ठोसेघर येथे अटक करण्यात आले.
सर्व मुद्देमाल दोन बंदूका एक एअर गण व एक सिंगल बोअर बंदूक व जिवंत काडतुसे, भेकर सोलल्याचे चाकू , कोयता व वेगवेगळ्या ठिकाणी लपविले मटण व कातडे हे सर्व घटनास्थळी दाखविले, सर्व गोष्टी वनविभागाने पंचा समोर जप्त केल्या.
आरोपीना अटक करण्यात आले असून वन गुन्हा नोंद झाला आहे.

शिकारी हे सराईत शिकारी आहेत त्यांनी ह्या पूर्वी अशे वेगवेगळे गुन्हे केलेले आहेत.त्याचे पुरावे वनविभागास मिळाले आहेत.पुढील चौकशी सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले हे करीत आहेत.

उपवनसंरक्षक सातारा महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल डॉ निवृत्ती चव्हाण, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे व वनपाल दीपक गायकवाड, खुशाल पावरा, व वनरक्षक विक्रम निकम, राज मोसलगी, अशोक मलप , मारुती माने, साधना राठोड, अश्विनी नरळे , पंच , पोलीस कॉन्स्टेबल राजेश वीरकर , सुहास पवार चालक सुरेश गबाले ,दिनेश नेहेरकर , पवन शिरतोडे या सर्वांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!