अध्यात्मिकआरोग्य व शिक्षणसामाजिक

1000 विद्यालयीन/महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे मोफत HPV लसीकरण..

मेधाविन फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या सहकार्याने तळेगाव व पवन मावळ या ठिकाणी दोन दिवस हे शिबिर संपन्न.

Spread the love

1000 विद्यालयीन/महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे मोफत HPV लसीकरण..Free HPV vaccination of 1000 school/college girls..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ७ सप्टेंबर.

मेधाविण फाउंडेशन च्या वतीने,
तळेगाव दाभाडे नगरपरिषद शाळा 2,3,4,5,6,
मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूल, समर्थ विद्यालय, स्वामी विवेकानंद स्कूल, अ‍ॅड पु. वा.परांजपे विद्यालय, साई मंदिर आश्रम शाळा,तसेच पवन मावळ येथील ज्ञानराज शिक्षण संस्थेच्या दीवाड, वारू कोथूर्णे पवनानगर येथील शाळांमध्ये एकूण 1000 विद्यालयीन/महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे मोफत HPV लसीकरण करण्यात आले.

भारतातील स्त्रियांच्या गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग उच्चाटन करण्या करीता सोमवार दिनांक 28 व 29 ऑगस्ट 2023 रोजी मेधाविन फाऊंडेशनच्या तसेच सी पी ए ए वतीने तळेगाव परिसरातील असणाऱ्या शाळेतील विद्यार्थिनींसाठी एचपीव्ही (ह्युमन पॉपिलोमा व्हायरस)गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी लसीकरण शिबिर (मोहीम) राबविण्यात आली. मेधाविन फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तसेच तळेगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या सहकार्याने तळेगाव व पवन मावळ या ठिकाणी दोन दिवस हे शिबिर राबविण्यात आले.

कॅन्सर पेशंट एड असोसिएशन मुंबई (C.P.P.A ) inकार्यकारी संचालिका डॉ. धनंजया सरनाथ यांनी लसीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी डॉ मनीषा गावंडे, डॉ मीनाक्षी,तज्ञ डॉक्टर, नर्स, पर्यवेक्षिका ढमढेरे यांनी विशेष परिश्रम घेतले.शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्रंथपाल दुर्गम मॅडम,सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

साधारणतः दवा बाजारात साडेतीन ते चार हजार किमतीला मिळणारी ही लस शिबिरात मोफत देण्यात आली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण अधिकारी शिल्पा रोडगे, मुख्याध्यापक पांडुरंग पोटे,गुरव मॅडम,काळोखे मॅडम,शेख मॅडम,बसवंते सर,थोरात मॅडम,कांबळे मॅडम,चिमटेसर,मीनाक्षी तिकोने यांचे शाळांच्या वतीने विशेष सहकार्य लाभले.

उद्घाटन नूतन प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे,महेशभाई शाह,सोनबा गोपाळे गुरुजी ,डॉ रेणुका पारवे,वैशाली दाभाडे,मंगल भेगडे,स्वाती पवार,जया पाटील,स्वाती दाभाडे यांच्या उपस्थित पार पडले.या वेळी डॉ धनंजया सरनाथ यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.पवनानगर येथील समारोप ज्ञानराज शिक्षण संस्थेचे ज्ञानेश्वर दळवी यांच्या उपस्थितीत पार पडला.
मेधावीन फाउंडेशनचे सदस्य मंगल भेगडे,जयश्री पाटील,स्वाती पवार, माया भेगडे,स्वाती दाभाडे,प्रीती नायडू(शाह),डॉ दिपाली भंडारी (झंवर),डॉ रेणुका पारवे,अर्चना देशमुख,डॉ लता पुणे यांनी लसीकरणच्या जागरूकता पासून ते लसीकरण शिबिर पूर्ण होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!