क्रीडा व मनोरंजनमावळ

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे च्या वतीने “रोटरी शिक्षक रत्न पुरस्कार “.

15 शिक्षक रत्नांचा सत्कार 5 सप्टेंबर शिक्षक दिनी सत्कार तळेगाव दाभाडे येथील लायन्स क्लब हॉल येथे आयोजित केला..

Spread the love

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे च्या वतीने “रोटरी शिक्षक रत्न पुरस्कार “.”Rotary Teacher Ratna Award” by Rotary Club of Talegaon Dabhade.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ७ सप्टेंबर.

प्रकल्प प्रमुख रो नितीन फाकटकर सर यांच्या संकल्पनेतून व अध्यक्ष उद्धव चितळे,उपाध्यक्ष कमलेश कारले,सचिव श्रीशैल मेंथे यांच्या पुढाकारातून कला,क्रीडा,आरोग्य,अध्यात्म अश्या पुस्तकी विश्र्वा वैत्यारिक्त ज्ञान दान करणाऱ्या विविध 15 शिक्षक रत्नांचा सत्कार 5 सप्टेंबर शिक्षक दिनी सत्कार तळेगाव दाभाडे येथील लायन्स क्लब हॉल येथे आयोजित केला होता.

१)योग शिक्षिका पूनम ढोरे
२)नृत्य शिक्षक गगन सिंग
३) कराटे शिक्षक रवींद्र वाघ
४)अध्यात्मिक शिक्षक संतोष महाराज मालपोटे
५)सांस्कृतिक नृत्य शिक्षिका मिनल कुलकर्णी
६)अंगणवाडी शिक्षिका मंदा लाडके
७)झुंबा कोच मनीषा भेगडे
८)गायन शिक्षिका संपदा थिटे
९)क्रिकेट शिक्षक अनिल नाईक
१०)क्रीडा/पोलीस भरती शिक्षक विशाल मोरे
११)संगीत शिक्षक प्रतीक महाळसकर
१२)नापासांची शाळा शिक्षक स्नेहा सावंत पवार
१३) स्केटिंग शिक्षक राहुल लोंबार
१४)शिक्षिका कालिंदी कस्पटे
१५) स्कॉलरशिप शिक्षक उमेश इंगुळकर.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साप्ताहिक अंबर चे संपादक श्री सुरेश साखळकर यांच्या हस्ते या मावळातील रत्नांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.अनेक पुरस्कारार्थिनी भावना व्येक्त केल्या,काहींना नवीन ऊर्जा देणारा,काहींना वर्षांनी वर्षे काम करत असताना पहिल्यांदा दखल घेणारा, आपल्या लोकांनी केल्या मुळे आनंद देणारा,तसेच चेहऱ्यावर हसू आणि आनंद अश्रू देणारा असा सन्मान सोहळा होता.
रोटरी सदस्य परिवारातील ज्ञानदान देणाऱ्या शिक्षकांचा शर्मिला शाह,कीर्ती मोहरीर,वैशाली फाकटकर,शुभांगी कार्ले ,जयश्री ढम, भावना चव्हण,डॉ लता पुणे,शर्वरी देशपांडे,सुलभा मथुरे,कल्याणी मुंगी,अनुराधा जोशी यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

माजी अध्यक्ष यादवेंद्र खळदे,महेश महाजन,विश्वनाथ मराठे,श्रीराम ढोरे,जयवंत देशपांडे,दीपक गांगोली,विलास शाह,भालचंद्र लेले,डॉ ज्योती मुंडर्गी,राजन आंब्रे,निलेश भोसले,हृषिकेश कुलकर्णी,किरण परळीकर,डॉ प्रवीण माने आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्र संचालन कल्याणी मुंगी यांनी केले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन फाकटकर सर,फर्स्ट लेडी अर्चना चितळे, माजी अध्यक्ष मंगेश गारोळे,आनंद असवले,जनार्दन ढम,प्रसाद मुंगी,विकास उभे,प्रमोद दाभाडे यांनीविशेष प्रयत्न केलेधनंजय मथुरे यांनी सर्व कार्यक्रम आपल्या कॅमेरा मध्य टिपला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!