आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा. आमदार कृष्णराव भेगडे यांची इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेस भेट.

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण, बांधकाम वर्षभरात पूर्णत्वास आणावे, अशा प्रकारच्या सूचना मा. आमदार कृष्णराव भेगडे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना केल्या.

Spread the love

  मा. आमदार कृष्णराव भेगडे यांची इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेस भेट.

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, वार्ताहर १५ नोव्हेंबर.

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे आधारस्तंभ, मावळ भूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी सोमवारी  इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेला भेट दिली. संस्थेच्या नवीन इमारत बांधकाम, खेळाचे मैदान, लाॅन, संस्थेमध्ये सुरू असलेल्या जिन्याचे बांधकाम, शौचालय बांधकाम, प्रयोगशाळा, ॲनिमल हाऊस आदींची त्यांनी पाहणी केली. सर्व कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करावीत. विद्यार्थी केंद्रित सर्व उपक्रमांचे त्यांनी स्वागत केले.

अध्यक्ष भेगडे यांनी पाहणी दौऱ्यात ; खेळाच्या भव्य मैदानाला अंतिम रूप देताना स्टेडियममधील प्रेक्षकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करावी, मुलींच्या वसतिगृहाचा अधिकाधिक मुलींनी लाभ घ्यावा, नवीन इमारतीचे बांधकाम अतिशय मजबूत, दर्जेदार व उत्तम करून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी सातत्याने त्या कामाचा आढावा घेऊन बांधकाम वर्षभरात पूर्णत्वास आणावे, अशा प्रकारच्या सूचना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना केल्या. तसेच संस्थेचे कार्यक्षम अध्यक्ष. रामदास काकडे व  कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या माध्यमातून होत असलेल्या प्रगतीबाबत भेगडे यांनी समाधान व्यक्त केले.

भेटी दरम्यान संस्थेच्या नवीन इमारत बांधकाम व विकास कामांची माहिती देतांना संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी सांगितले की, संस्थेतील इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव कॅम्पसमध्ये डी फार्मसी, बी फार्मसी,कांतीलाल शहा विद्यालय,संत तुकाराम विद्यालय व श्रीराम विद्यालय या शाळा महाविद्यालयात सुमारे ८००० विद्यार्थी शिक्षण घेत असून इंद्रायणी महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान, बीबीए, बीसीए, तंत्रशिक्षण विभागात ४००० विद्यार्थ्यांना वर्गखोल्यात सातत्याने कमतरता भासत आहे. ही उणीव दूर करण्यासाठी संस्थेने अद्ययावत सर्व सोयीसुविधायुक्त असलेल्या सात मजली भव्य इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. या सुरू केलेल्या बांधकामाला कृष्णराव भेगडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे संचालक गणेश खांडगे यांची तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे याच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सदस्य संदीप काकडे, विलास काळोखे तसेच युवराज काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के मलघे, बी फार्मसीचे प्राचार्य डाॅ संजय आरोटे, डी फार्मसीचे प्राचार्य जी. एस. शिंदे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!