आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

लोणावळा महाविद्यालयात शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न..

Spread the love

लोणावळा महाविद्यालयात शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न..

आवाज न्यूज: लोणावळा, प्रतिनिधी, २४ नोव्हेंबर :

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वलवण लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तालुकास्तरीय (मुले/मुली) बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.

सदर स्पर्धेचे उद्घाटन लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त दत्तात्रय येवले व सचिव दत्तात्रय पाळेकर यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दिगंबर दरेकर यांनी केले. यावेळी महाविद्यालय विकास समिती सदस्य विशाल पाडाळे, व्ही.पी.एस. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य दहिफळे सर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय धावपटू हर्षदा जोशी-दुबे, स्पर्धेचे पंच आयुष अभानी, चैतन्य मोहिते, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. राहुल सलवदे आदी मान्यवरांसह विविध शाळांचे क्रीडाशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत सुमारे 158 मुले/मुली खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय साळुंके यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडाशिक्षक प्रा. दीपक तारे यांनी केले. सदर स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रमेशचंद्र नय्यर, विश्वस्त अँड. नीलिमा खिरे, विजय दर्यानानी, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शैलजा फासे यांचे योगदान लाभले.

स्पर्धेचा गटवार निकाल खालीलप्रमाणे – वयोगट 14 (मुले) – 1) विघ्नेश बालाकुमार (हायविजन इंग्लिश मिडीयम स्कुल), 2) तनुष शैताले (हायविजन इंग्लिश मिडीयम स्कुल), 3) जित थोरात (कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कुल) 4) अद्वैत इंगळे (हायविजन इंग्लिश मिडीयम स्कुल), 5) सोहम मंगवाणी (हायविजन इंग्लिश मिडीयम स्कुल) राखीव – 1) पार्थ सारथी (हायविजन इंग्लिश मिडीयम स्कुल) 2) सार्थक मावकर (कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कुल). मुली – 1) खुशी यादव (डॉ. ए. सि. हायस्कुल), 2) रुक्मिणी पवार (ऍप्रोस इंटरनॅशनल स्कुल) 3) सबा शेख (व्ही. पी. एस. हायस्कुल) 4) श्रेया भसे (कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कुल) 6) प्राची चांदेकर (सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव) राखीव – 1) आराधना राजहंस (सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव), 2) श्रेया बानेकर (कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कुल).

वयोगट १७ – मुले – 1) प्रणव पोवार (रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन), 2) तनिष कडू (हायव्हीजन इंग्लिश स्कुल), 3) अवधूत बानेकर (कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कुल), 4) रुद्र मंत्री (ऍप्रोस इंटरनॅशनल स्कुल), 5) यश ढमाले (ऍप्रोस इंटरनॅशनल स्कुल). राखीव – 1) अरिहंत चौधरी (ऍप्रोस इंटरनॅशनल स्कुल), 2) अर्णव थंपी (ऍप्रोस इंटरनॅशनल स्कुल) मुली – 1) क्षितिजा डोके (इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय), 2) नक्षत्रा सोनवणे (मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम. 3) श्रेया सरपटे (ऍप्रोस इंटरनॅशनल स्कुल), 4) राजुला जगदाळे (सरस्वती विद्या मंदिर), 5) नितिषा दाऊदखाणी (स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुल). राखीव – 1) सानिका मराठे (कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कुल), 2) माया पिंगट (व्ही. पी. एस. हायस्कुल).

वयोगट १९ – मुले 1) आयुष कदम (डी. पी. मेहता ज्युनियर कॉलेज), 2) अजय बेंगळे ((डी. पी. मेहता ज्युनियर कॉलेज), 3) धनराज पाठारे ((डी. पी. मेहता ज्युनियर कॉलेज), 4) तोमर किशन ((डी. पी. मेहता ज्युनियर कॉलेज), 5) तय्याब शेख (फजलानी इंटरनॅशनल स्कुल). राखीव – 1) सुभान खान (फजलानी इंटरनॅशनल स्कुल), 2) कुणाल तरस (हायव्हीजन इंग्लिश स्कुल). मुली -1 ) पूजा हेमाडे (डी. पी. मेहता ज्युनियर कॉलेज), 2) सृष्टी साबळे (डी. पी. मेहता ज्युनिअर कॉलेज). 3) मरियम बानू शेख (फजलानी इंटरनॅशनल स्कूल)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!