आरोग्य व शिक्षण

लोणावळा पुणे लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी तळेगाव रेल्वेस्थानकावर आंदोलन..

तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर लोककल्याण कृती समिती व शिक्षकांच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले.

Spread the love

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर.

दुपारच्या सत्रात लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात या मागणीसाठी गुरुवारी (दि. २४) सकाळी ९ वाजता तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर लोककल्याण कृती समिती व शिक्षकांच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले.

लोणावळा-पुणे रेल्वे मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३ या दरम्यान लोकल नसल्याने शिक्षक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांच्यासह प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे. जवळपास तीनवर्षांपासून दुपार क्षेत्रातील लोकल सेवा बंद आहेत. दुपारच्या सत्रात पूर्ववत लोकल सेवा सुरू करावी. या मुख्य मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सुमारे अर्धा तास आंदोलन करण्यात आले. यावेळी लोक कल्याणकारी समिती, जिल्हा परिषद शिक्षक, नगरपालिका शिक्षक यांच्यासह प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टेशन मास्तरांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!