आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

रविवार दिनांक २७ रोजी शिवसेना सदस्य नोंदणी व पदाधिकाऱ्यांची मुलाखतीच्या कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद.

कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत युवासेना जिल्हाध्यक्ष. अनिकेत  घुले यांनी दीपप्रज्वलन केले.

Spread the love

रविवार दिनांक २७/११/२०२२ रोजी शिवसेना सदस्य नोंदणी व पदाधिकाऱ्यांची मुलाखतीच्या कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद. 

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी २८ नोव्हेंबर.

रविवार दिनांक २७/११/२०२२ रोजी शिवसेना सदस्य नोंदणी व पदाधिकाऱ्यांची मुलाखतीचा कार्यक्रम ज्ञानेश्वर नगरी तळेगाव दाभाडे येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास बहुसंख्य इच्छुकांनी सभासद नोंदणी व मुलाखती दिल्या व अनेक जुन्या शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली.

याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना, तळेगाव शहर प्रमुख सिद्धनाथ नलावडे यांनी तळेगाव शहरांमध्ये पूर्ण ताकदीने संघटनेचे काम करू अशी ग्वाही दिली, व तळेगाव शहर प्रमुख देव खरटमल यांनी ह्या वेळच्या नगर परिषदेत शिवसेनेचे नगरसेवक पोहोचवू असे आश्वासन दिले व पुणे जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे यांनी महिला आघाडी सक्षम करू असे सांगितले. त्याचप्रमाणे तालुकाप्रमुख आशिष भाऊ ठोंबरे यांनी तळेगाव शहराला सक्षम करू असे सांगितले.

आणि उपजिल्हाप्रमुख सुरेश भाऊ गायकवाड यांनी ही तळेगाव शहराच्या व संघटनेच्या वाटचालीत प्रगती करण्यास हवी ती मदत करू आणि मावळ तालुका संघटिका अनिताताई गोणते यांनी महिलांचे प्रश्न सोडवण्यास आपण मदत करू असे सांगितले ,या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत युवासेना जिल्हाध्यक्ष. अनिकेत  घुले यांनी दीपप्रज्वलन केले. पुणे जिल्हा संघटक ॲडव्होकेट अविनाश  रहाणे यांनी तळेगाव शहराला पुढील वाटचालीसाठी जी कोणती मदत करावी लागेल ती आपण करू, संघटना मजबूत करू व तळेगाव शहर नगर परिषद निवडणूक  सक्षमपणे स्वबळावर लढू आणि तळेगाव शहरात शिवसेनेची ताकद वाढवु असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमास उपस्थित तळेगाव शहर प्रमुख गाव विभाग सिद्धनाथ नलावडे व तळेगाव शहर प्रमुख स्टेशन विभाग देव खरटमल कार्याध्यक्ष सतीश गरुड माजी उपतालुका प्रमुख  कैलासराव सगळे . शहरप्रमुख खंडुजी टकले व माझी शहर प्रमुख राजेश नवले, उपशहर प्रमुख सतीश शेलार उपशहर प्रमुख सागर जाधव ,उपशहर प्रमुख शांताराम तांबोळी ,तळेगाव विभाग प्रमुख सदाशिवराव भोसले, नागेश  फुलारी व दिलीप दळवी दशरथ पुजारी विजय शेटे दत्तात्रय भेगडे शांताराम लिंबोरे संगीता ताई सोणवने लोणावळा शहर उप प्रमुख. संजय भोईर, किसन जांभुळकर, अशोक निकम पोपट राक्षे, सोमटणे शाखाप्रमुख राजू मुर्हे भारतीय कामगार सेना सदस्य दत्तात्रय शिंदे, विराज शिरोडकर ,शेखर कोतुळकर ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.  उमेश  गावडे यांनी केले व आभार प्रदर्शन सतीश गरुड यांनी केले, कार्यक्रमाचे ठिकाण उपलब्ध करून दिल्याबद्दल  दिलीप भाऊ कुल यांचे विशेष आभार मानण्यात आले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!