आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जल जीवन मिशन अंतर्गत या पाणी पुरवठा योजनांसाठी एकुण ४‌ कोटी ०१ लक्ष रु.निधी उपलब्ध..

आंदर मावळातील माळेगाव खु. पिंपरी, माळेगाव बु.-तळपेवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनांचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत काल संपन्न

Spread the love

जल जीवन मिशन अंतर्गत या पाणी पुरवठा योजनांसाठी एकुण ४‌ कोटी ०१ लक्ष रु.निधी उपलब्ध..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी २८ नोव्हेंबर.

  आंदर मावळातील माळेगाव खु. पिंपरी, माळेगाव बु.-तळपेवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनांचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत काल संपन्न झाला.

“जल जीवन मिशन अंतर्गत या पाणी पुरवठा योजनांसाठी एकुण ४‌ कोटी ०१ लक्ष रु.निधी उपलब्ध झाला आहे. आंदर मावळमधील या गावांसह येथील वाडी-वस्तीवरील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचणार आहे. त्यामुळे कामास देखील तात्काळ सुरुवात करण्यात येणार असून संपुर्ण पाणी योजनेचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे.हे काम पुर्ण झाल्यानंतर येथील स्थानिक ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा मुलभुत प्रश्न सुटेल,असा विश्वास वाटतो..

या भुमिपूजन समारंभास माजी जि.प.सदस्या. शोभाताई कदम, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा दिपालीताई गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा .सारिका शेळके, मा.नगरसेविका ,संगिताकाकी शेळके, सरपंच.साधनाताई काठे, उपसरपंच .अंकिताताई गायकवाड, .सविताताई बोऱ्हाडे, .शशिकलाताई सातकर, .अदिकाताई तनपुरे, अनिताताई आंद्रे, माजी सभापती शंकरराव सुपे, मा.चेअरमन लक्ष्मणराव ठाकर, मा.सरपंच .दत्तात्रय पडवळ, ग्रामपंचायत सदस्य .बाळासाहेब खंडागळे, .शंकर बोऱ्हाडे, .रोहिणी कोकाटे, .कुंदा बोऱ्हाडे, ग्रामसेवक .राहुल देशमाने,.राजेश कोकाटे, .मारुती करवंदे, सरपंच इंगळुण .सुदाम सुपे, उद्योजक भरत जोरी, .कल्पेश मराठे, .सुनिल ताते, अंकुश ठाकर, बाबासाहेब घाडगे, .कमल कोकाटे, अरुण मोरमारे, .दशरथ दगडे, .यमाजी बोऱ्हाडे, .चिंधु बोऱ्हाडे, संदीप दगडे तसेच आंदर मावळमधील जेष्ठ मान्यवर, आजी-माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!