आरोग्य व शिक्षण

भारतीय जनता पक्षाकडून भांगरवाडी रेल्वैगेटबाबत व रेल्वेकडून उड्डाणापूल बांधकाम करण्यात होत आसलेल्या दिरंगाई बाबत सह्यांची मोहीम..

लोणावळा रेल्वेचे अभियंता आणि लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासकीय आधिकारी यांची भांगरवाडी उड्डाणापूल कामाबाबत साधकबाधक चर्चा..

Spread the love

रेल्वेचे अभियंता आणि लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासकीय आधिकारी यांची भांगरवाडी उड्डाणापूल कामाबाबत चर्चा .लो

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, २९ नोव्हेंबर.

रेल्वेचे अभियंता आणि लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासकीय आधिकारी यांची भांगरवाडी उड्डाणापूल कामाबाबत साधकबाधक चर्चा झाली.काम कुठे थांबले , काही ञुटी निवारण करण्यासाठी पालिकेच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली.

लोणावळ्याचे प्रशासकीय आधिकारी पंडीत खंडू पाटील यांचे अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली.यावेळी रेल्वेकडून पश्चिम रेल्वेचे उपमुख्य अभियंता सचिन मुंगशे (पाटील) ,आभियंता आजय महाराज , तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या बांधकाम खात्याच्या अभियंता l वैशाली मठपती , उपमुख्याधिकारी भगवान खाडे , माजी नगरसेवक विशाल पाडाळे , बाळासाहेब जाधव आदीसह पञकार यावेळी उपस्थित होते.

भांगरवाडी रेल्वेगेटवर वारंवार होणाऱ्या कोंडीवर उपाययोजना म्हणून भांगरवाडी नांगरगाव या रेल्वे उड्डाणापूल बांधकामाचे काम गतीने होणे , यासाठी संपादित जमिन ,त्यावरील झालेली बांधकामे , उच्च दाबाने वरून गेलेल्या विजेच्या लाईनबाबत योग्य निर्णय घेणे , पालिकेच्या वतीने करण्यात आलेले डिझाईन व रैल्वेचे डिझाईन यातील तफावत दूर करून मधोमध तोडगा काढून काम जुलै २०२३ पर्यत मार्गी लावणे , यावर चर्चा झाली.
यावेळी बांधकाम खात्याचे आधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते..

दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून ता.३० रोजी भांगरवाडी रेल्वैगेटबाबत व रेल्वेकडून उड्डाणापूल बांधकाम करण्यात होत आसलेल्या दिरंगाई बाबत , रेल्वेकडून दुपारच्या बंद लोकल पुन्हा सुरू कराव्यात , तसेच लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांना खंडाळा रेल्वेस्टेशनऐवजी लोणावळा रेल्वेस्टेशनवर थांबा द्यावा , यासाठी सह्यांची मोहीम आयोजित केली आहे..
उपमुख्य अभियंता सचिन मुंगशे पाटील , आणि अभियंता अजय महाराज यांचेबरोबर मुख्याधिकारी कार्यालयात बैठकीत भांगरवाडी रेल्वे पुलाबाबत चर्चा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!