आरोग्य व शिक्षण

कात्रज ते वडगाव मावळ सहित,पीएमपीएमएलचे पुणे जिल्ह्यातील १२ बस मार्ग आजपासून बंद..

संबंधित आगार व्यवस्थापक यांना ग्रामीण भागातील बस मार्ग बंद करण्याबाबतची कार्यवाही 3 डिसेंबर पासून करण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत.

Spread the love

कात्रज ते वडगाव मावळ सहित,पीएमपीएमएलचे पुणे जिल्ह्यातील १२ बस मार्ग आजपासून बंद..

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, ३ डिसेंबर.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संपाच्या कालावधीत ग्रामीण भागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या बस मार्गांच्या संचालनासाठी येत असलेल्या खर्च व या मार्गांपासून मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. पीएमपीएमएल कडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ग्रामीण भागातील ४० बस मार्गावर पूर्ववत वाहतूक सेवा सुरू करण्याबाबत कळविण्यात आलेले होते.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ४० बस मार्गांपैकी ११ मार्गांवर बस सेवा सुरू असल्याचे कळविण्यात आले होते. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील ११ बस मार्ग २६ नोव्हेंबर २०२२ पासून बंद करण्यात आले आहेत. तसेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीएमपीएमएल यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील १२ बस मार्ग बंद करण्यात आले आहेत.

मार्ग क्रमांक: पासून: पर्यंत : शेड्युलसंख्या :

७४ : हिंजवडी शिवाजी चौक : घोटावडे फाटा : ३ :

८६ : पुणे स्टेशन: पौड एसटी स्टँड : ६ :

१०६ : एनडीए गेट नंबर १० :सिम्बॉयसिस नर्सिंग सुसगाव: ४

१३५ वाघोली: रांजणगाव सांडस १५७ भेकराईनगर: तळेगाव ढमढेरे : २

१५९ : शिक्रापूर एसटी स्टँड: लोणी धामणी : ३

१६४ बीआरटी: शिक्रापूर एसटी स्टँड: न्हावरे: ३

१८४ हडपसर: रामदरा लोणी काळभोर : १

२२८ : कात्रज : वडगाव मावळ : १०

२६४ : भोसरी :पाबळगाव :१

३१६ : चिंचवडगाव : खांबोली कातरखडक : १

३६८ : निगडी : लोणावळा रेल्वे स्टेशन : १४

एकूण : ४९.

या बसेस नतावाडी, कोथरूड, कात्रज, हडपसर, पुणे, स्टेशन, निगडी, भोसरी, पिंपरी व बालेवाडी आगाराकडील आहेत. सर्व संबंधित आगार व्यवस्थापक यांना ग्रामीण भागातील बस मार्ग बंद करण्याबाबतची कार्यवाही 3 डिसेंबर पासून करण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!