आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजमहाराष्ट्र

दिवसाढवळ्या होताहेत तळेगावात चोऱ्या. 

पोलीस प्रशासनाचा वचक कमी झालाय का ? असे प्रकार बंद व्हावेत अशी ज्येष्ठ नागरिकांची मागणी..

Spread the love
दिवसाढवळ्या होताहेत तळेगावात चोऱ्या. 

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी ७ डिसेंबर.

तळेगाव स्टेशन परिसरात इंद्रायणी वसाहतीत लेन नं.१च्या जवळपास महिलेची पर्स मोबाईलसह अज्ञाताने हिसकावून नेली. मंगळवारी (दि.०६)सायंकाळी ६ वा.च्या सुमारास उज्वला शशिकांत खरात (वय५३) राहणार सुकूल सोसायटी तळेगाव स्टेशन ता.मावळ)ही महिला तळेगाव स्टेशन भागातील श्री स्वामी समर्थ नगर येथील सुकूल वसाहती मधुन इंद्रायणी वसाहत येथील ब्रम्हगिरी सोसायटी मध्ये एकट्या चालल्या असता दुचाकी वरुन एक अज्ञात मुलगा (वय अंदाजे २०) अचानक त्याच्या समोरुन आला आणि त्यांने उज्वला खरात यांना जोरात धक्का मारुन त्यांची मोबाईल ठेवलेली पर्स हिसकावून लांबवली.

तळेगावात अशा चोरांचा सुळसुळाट झाला असुन असे प्रकार तळेगाव दाभाडे येथे वारंवार घडत आहेत यामुळे महिलांना,जेष्ठ नागरिकांना,वृध्दांना एकटे  फिरणे अवघड झाले आहे.

मागील आठवड्यात नगरपरिषद शॉपिंग कॉम्प्लेक्स आवारात महिलेला नेऊन चोरट्याने दागिने घेऊन पोबारा झाला, रविवारच्या आठवडा बाजारात तर मोबाईल चोरी, ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक, पाकिट चोरणे, दागिने चोरणे,सतत असे प्रकार होत आहेत.

तरी पोलीसांनी अशा गुन्हेगारांवर करडी नजर  ठेवून कडक कारवाई केली पाहीजे, चोरावर पोलीस प्रशासनाचा वचक राहिला की नाही? अशा चर्चेला नागरिकांमध्ये ऊत आलाय..

असे प्रकार बंद व्हावेत अशी ज्येष्ठ नागरिकांची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!