आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

श्रीएकविरा कृति समितीतर्फे ता.१३ ला बेमुदत उपोषण करणार ..

Spread the love

श्रीएकविरा कृति समितीतर्फे ता.१३ ला बेमुदत उपोषण करणार

 ्आवाज न्यूज,  लोणावळा प्रतिनिधी.७ डिसेंबर.

श्रीएकविरा कृति समितीतर्फे ता.१३ रोजी बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे कृती समितीतर्फे जाहीर करण्यात आले. भारतरत्न महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार आर्पण करून आढावा बैठकीला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी रेल्वेकडून जांभूळ भुयारी मार्ग , मळवली रेल्वेवरील उड्डाणापूल ,कामासाठी रेल्वेगेट बंद केल्यास होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढावा , कामशेत रेल्वेगेट क्रमांक ४२ ,आदी प्रशाबाबत रेल्वेने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तसेच सकाळी दहा ते दुपारी तीन या पाच तासामधील लोकलसेवा पुन्हा सुरू कराव्यात , या मागणीसाठी हे बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.

इंद्रायणीनदी पाञ खोलीकरण करण्याबाबतही पीएमआरडीए कडे पञव्यवहार करण्यात येणार असल्याचे कृती समितीतर्फे सांगण्यात आले.

लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक किशोर धुमाळ हेही उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीएकविरा कृती समितीतर्फे भाई भरत मोरे , कृती समिती अध्यक्ष व माजी सरपंच बाळासाहेब भानुसघरे, पाटणचे माजी सरपंच गुलाब तिकोणे ,भाजेचे माजी सरपंच नंदकुमार पदमुले , देवलेचे एकनाथं आंबेकर , राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दिपकशेठ हुलावळे , उपसरपंच किरण हुलावळे , सदापूर मळवलीचे माजी सरपंच सुनिल दळवी , प्रहर्षण भावसार , उस्मानशेठ इनामदार , पोलीसपाटील शहाजहान इनामदार , माजी चेअरमन विठ्ठल वाघमारे , कामशेतचे व्यापारी विलास भाटेवरा , आणि पंचक्रोशितील आजीमाजी सरपंच , उपसरपंच , शेतकरी उपस्थित होते.

ता.१० पर्यत रेल्वे प्रशासनाने कामाबाबत ठोस अश्वासन न दिल्यास आंदोलन करण्यात श्री, एकविरा कृती समिती ठाम राहील. पालकमंञी चंद्रकांतदादा पाटील यांनी पीएमपीएमएल पुन्हा सुरू केल्या , पण शहरात सत्तरमधे दिवसभर , जेष्ठांना चाळीसमधे दिवसभर सेवा या ग्रामीण भागातही चालू ठेवाव्यात , असे निवेदन देण्यात येणार.

असे कृति समितीतर्फे राष्ट्रवादीचे सहकारसेलचे तालुकाध्यक्ष नंदकुमार पदमुले यांचेकडून प्रसिध्दीस देण्यात आले आहे..
इंद्रायणीनदीचे पाञ खोलीकरण न करता , अश्वासन देणाऱ्या पीएमआरडीए विरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!